टी-20 वर्ल्ड कपचा थरार यावर्षी 1 जूनपासून यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये रंगणार आहे. तसेच आयपीएलनंतर लगेचच ही स्पर्धा सुरू होणार आहे. याबरोबरच आयपीएल 22 मार्चपासून सुरू होऊ शकते. तर मेच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएल संपू शकते. यानंतर 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने एक खास योजना आखली आहे.
आयपीएलच्या मध्यभागी बोर्ड खेळाडूंना तयारीसाठी न्यूयॉर्क (यूएसए) येथे पाठवणार असल्याचे पीटीआयच्या अहवालातून समोर आले आहे. तसेच यासाठी जे खेळाडू वर्ल्ड कप खेळणार आहेत ते अमेरिकेला रवाना होतील. याबाबत पीटीआयच्या अहवालातून बीसीसीआय टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय खेळाडूंना आधी न्यूयॉर्कला पाठवू शकते, अशी माहिती समोर आली आहे.
यासाठी, ज्या खेळाडूंचे संघ बाद फेरीसाठी पात्र ठरू शकणार नाहीत ते आयपीएल प्ले-ऑफ दरम्यान यूएसएला जातील. तसेच टीम इंडिया 5 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करेल आणि पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळेणार आहे.
तसेच ही स्पर्धा 1 जूनपासून सुरू होणार असून त्यासाठी सर्व 20 संघांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्यांच्या संघाची घोषणा करावी लागणार आहे. याबरोबरच, संघाची घोषणा केल्यानंतर 20-22 मे पर्यंत अंतिम संघात बदल करता येऊ शकतात. यानंतर जे काही बदल घडतील, त्यासाठी आयसीसीकडून विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे.
याबरोबरच, आयपीएलचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु स्पर्धेच्या मध्यभागी पहिल्या टप्प्यानंतर वर्ल्ड कपचा संघ जाहीर केला जाईल हे निश्चित आहे. तसेच भारतीय संघ 5 जूनला आयर्लंडविरुद्ध मोहिमेला सुरुवात करेल, त्यानंतर 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे.
दरम्यान, भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि यूएसए ग्रुप ए मध्ये आहेत. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होत असून सर्व 5-5 गटात विभागले गेले आहेत. प्रत्येक संघाला साखळी टप्प्यात 4-4 सामने खेळावे लागणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG 3rd Test : इंग्लंडकडून राजकोट कसोटीसाठी प्लेइंग 11 ची घोषणा! प्रमुख गोलंदाजाचं कमबॅक तर बशीर बाहेर
- Wrestling Federation of India : भारतीय कुस्तीसाठी आनंदाची बातमी; UWWने निलंबन घेतलं मागे…