Wrestling Federation of India : सध्या जागतिक कुस्ती महासंघाने मोठा निर्णय घेत भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन हटवलं आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व पुन्हा मिळाले आहे. तसेच भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर देखील बराच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व बाबात मंगळवारी निर्णय घेण्यात आला आहे.
याबरोबरच, WFI योग्य वेळेत निवडणूक घेण्यात अयशस्वी ठरल्याने UWW ने गेल्या वर्षी 23 ऑगस्ट रोजी WFI ला तात्पुरते निलंबित केले होते. तसेच भारतीय कुस्ती महासंघातील वाद चव्हाट्यावर आला होता. तत्कालीन अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला पैलवानांनी गंभीर आरोप केले आहेत. ब्रीजभूषण यांनी महिला खेळाडूंसह प्रशिक्षकांचा लैगिंक छळ केला असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यामुळे ते पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक लढू शकले नाहीत.
जागतिक कुस्ती महासंघाने निलंबनाचा पुढील आढावा घेण्यासाठी 9 फेब्रुवारी रोजी बैठक घेतली आणि सर्व घटक आणि माहिती विचारात घेतल्यानंतर निलंबन उठवण्याचा निर्णय घेतला. जागतिक कुस्ती महासंघाने अखेर भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन हटवले आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये महासंघाचे सदस्यत्व अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले होते.
अशातच अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेण्यामागचे कारण समोर आले होते. या संदर्भात जागतिक कुस्ती महासंघाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निलंबित करण्यात आले होते. कारण भारतीय महासंघ वेळेवर निवडणुका घेण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे तात्पुरते निलंबन करण्यात आले होते.
दरम्यान, या निवडणुका 1 जुलै 2024 नंतर कोणत्याही वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान घेतल्या जातील. WFI ताबडतोब UWW ला लेखी गॅरंटी देईल की सर्व कुस्तीपटूंना सर्व WFI स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक खेळ आणि इतर कोणत्याही प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोणताही भेदभाव न करता भाग घेण्याची परवानगी दिली जाईल, असे आदेशात म्हंटले आहे.