दक्षिण आफ्रिकेची कर्णधार ‘लॉरा वोल्वार्ट’ला (Laura Wolvaardt) इंग्लंडविरूद्धच्या चमकदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. वास्तविक, लॉरा वोल्वार्टने ताज्या महिला वनडे क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. तिने नॅट सायव्हर-ब्रंटला (Nat Sciver-Brunt) मागे टाकून ही कामगिरी केली. वोल्वार्टने पहिले स्थान पटकावण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धेत तिने पहिल्या डावात अव्वल स्थान गाठले होते.
नॅट सायव्हर-ब्रंटने 2 स्थान गमावले आहेत. आता तिची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. यासोबतच श्रीलंकेची खेळाडू ‘चमारी अटापट्टू’ला (Chamari Athapaththu) एका स्थानाचा फायदा झाला असून ती दुसऱ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाची स्टार फलंदाज ‘एलिसे पेरी’लाही (Ellyse Perry) फायदा झाला आहे. पेरीने 714 गुणांसह चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. भारताविरूद्ध ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात तिने तुफानी शतक झळकावले होते.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि स्म्रीती मानधना (Smriti Mandhana) यांना ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 सामन्यातील फ्लॉप कामगिरीचा फटका बसला आहे. या दोन्ही भारतीय महिला खेळाडू संघाच्या प्रमुख आहेत, मात्र आतापर्यंतच्या मालिकेत त्यांची बॅट शांत राहिली आहे. मानधनाने 2 सामन्यात एकूण 17 धावा केल्या आहेत. तर हरमनप्रीतने 55 धावा केल्या आहेत.
भारताची स्टार डावखुरी फलंदाज फलंदाज स्म्रीती मानधना (Smriti Mandhana) आता आयसीसी वनडे क्रमवारीत चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानी घसरली आहे. तर हरमनप्रीतला 2 स्थानांचे नुकसान झाले असून तीची 11व्या स्थानी घसरण झाली आहे.
???? BREAKING ????
Laura Wolvaardt reclaims the No. 1 spot in the ICC Women’s ODI Player Rankings! ????
A true champion dominating the game ????????????#Cricket #ICC #Ranking #LauraWolvaardt pic.twitter.com/fjCIWxNa17
— Sportskeeda (@Sportskeeda) December 10, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
SFA चॅम्पियनशिप 2024 मुंबई: निर्वाण कैस्थ, आरुष गोरे, साची नागोटकर यांना सुवर्णपदक
IPL; सध्याचे 3 आयपीएल कर्णधार! ज्यांनी जिंकले सर्वाधिक सामने
जसप्रीत बुमराह नाही, तर ‘हा’ भारताचा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज! माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य






