---Advertisement---

हार्दिक पंड्याच्या ट्रेड डीलआधी मुंबई इंडियन्सचा मास्टर प्लॅन! ‘या’ अनुभवी खेळाडूचा केला समावेश

On: शनिवार, ऑगस्ट 22, 2026 4:10 PM
---Advertisement---

आयपीएल 2027 मधील ट्रेड डीलबाबत सध्या जोरदार चर्चा सूरू आहे. यामध्ये स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या नेमक्या कोणत्या संघात जाणार याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. हा सर्व गोंधळ सुरू असताना मुंबई इंडियन्सने शनिवारी (22 ऑगस्ट) एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

एमआयने त्यांच्या सोशल मीडियामार्फत अधिकृतपणे डायरेक्टर ऑफ परफॉर्मन्स म्हणून झुबिन भरुचा यांचे नाव जाहीर केले आहे. ते एमआयच्या इकोसिस्टममधील सर्व परफॉर्मन्स शाखांमधील सध्याच्या बहु-शाखीय नेतृत्व गटासोबत मिळून काम करतील.

एमआयने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले की, ते एमआय इकोसिस्टममधील सध्याच्या सपोर्ट स्टाफसोबत काम करेल आणि खेळाडूंच्या विकासात अतुलनीय यश मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या दृष्टिकोनाला पुढे नेण्याचे काम सुरू ठेवेल.

झुबिन भरुचा नेमके कोण?
झुबिन यांना प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभव आहे. त्यांनी मुंबई आणि सरे काउंटी क्रिकेट क्लबकडून हे सामने खेळले आहेत. त्याचबरोबर त्यांनी आयपीएलचा पहिला विजेता संघ राजस्थान रॉयल्सचे संचालक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. ते या संघासोबत 2008 ते 2015 पर्यंत होते. नंतर त्यांनी 2016 आणि 2017 हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे तांत्रिक संचालक म्हणून काम पाहिले आहे.

तसेच 2018 पासून ते रॉयल्ससोबत क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक म्हणून कार्यरत होते आणि आता ते मुंबई इंडियन्समध्ये सामील झाले आहेत.

भरुचा यांची क्रिकेट कारकिर्द
भरुचा यांना 17 प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभव आहे. त्यांनी यामधील 28 डावांमध्ये तीन शतके आणि चार अर्धशतकांसह 1021 धावा केल्या आहेत. तसेच त्यांनी 11 लिस्ट ए सामन्यांमध्ये दोन अर्धशतके करत 189 धावा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी संघापैकी एक आहे. त्यांनी 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. या स्पर्धेतील शेवटची ट्रॉफी त्यांनी 2020 मध्ये जिंकली होती. त्यानंतर मात्र त्यांनी केवळ दोन वेळाच प्लेऑफची फेरी गाठली आहे.

हार्दिकने जेव्हापासून एमआयचे नेतृत्व स्विकारले आहे, तेव्हापासून त्यांचा संघर्ष अधिक वाढला आहे. आता तो एका ट्रेडद्वारे दुसऱ्या संघात सामील होऊ शकतो. असे झाले तर, तिलक वर्माचे नाव मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी शर्यतीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---