---Advertisement---

VIDEO: कोलंबोमध्ये यशस्वी जैस्वालची श्रीलंकन खेळाडूशी बाचाबाची! डोके धडवकले, मग दिला धक्का

On: रविवार, ऑगस्ट 23, 2026 5:28 PM
---Advertisement---

कोलंबोमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना सूरू आहे. आज (रविवार, 23 ऑगस्ट) या सामन्याचा पहिला दिवस असून यामध्ये भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा खेळाडू असिथा फर्नांडो यांच्यात झटापट झाली.

भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही घटना भारताच्या डावाच्या 17 व्या षटकावेळी घडली. यशस्वी आणि असिथा यांच्यातील वाद इतका वाढला की त्यांना रोकण्यासाठी बाकी खेळाडूंना हस्तक्षेप करावा लागला. हा वाद का झाला, यामागचे कारण जाणून घेऊ.

सामन्यातील 17 वे षटक वेगवान गोलंदाज असिथाने टाकले. त्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारतीय सलामीवीर क्लीनोबोल्ड झाला. यशस्वी 53 चेंडूत 9 चौकारांच्या सहाय्याने 45 धावा करत विकेट गमावून बसला. बाद झाल्यावर यशस्वी शांतपणे पॅव्हेलियनकडे चालत होता. तेवढ्यात श्रीलंकेच्या गोलंदाजाने त्याला काहीतरी म्हटले आणि तो मागे वळून असिथाच्या दिशेने गेला.

दोघांमधील वाद इतका वाढला की ते एकमेकांना डोक्याने धडक देऊ लागले. श्रीलंकेच्या बाकी खेळाडूंनी हस्तक्षेप करत दोघांमधील वाद थांबवला. बाद होण्याआधी यशस्वीने असिथाला लागोपाठ तीन चौकार मारले होते, मात्र बॅटफूटवर एक शॉट खेळण्याचा प्रयत्नात तो बाद झाला आणि त्याचे अर्धशतक हुकले.

गॉल कसोटीमध्ये यशस्वी आणि श्रीलंकेचा विकेटकीपर-फलंदाज निरोशन डिकवेला यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीचा संदर्भ घेत कोलंबो कसोटीमध्ये फर्नांडोने भारताच्या युवा फलंदाजाला डिवचले. यामुळे परत जाणारा यशस्वी माघारी पतरला आणि श्रीलंकेच्या गोलंदाजाशी वाद घालू लागला.

सामन्याची स्थिती पाहिली तर, भारताने सुरूवात चांगली केली होती. मात्र उपकर्णधार केएल राहुल 18 धावा करत बाद झाला. तत्पूर्वी त्याने यशस्वीसोबत 37 धावांची भागीदारी केली होती. यशस्वी बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि मागील सामन्यात दीडशतकी खेळी करणारा देवदत्त पडिक्कल यांनी भारताचा डाव सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. गिल अर्धशतक करत बाद झाला.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला असता भारताने 5 विकेट्स गमावत 300 धावा धावफलकावर जोडल्या आहेत. पडिक्कल 117 तर रवींद्र जडेजा 43 धावा करत बाद झाले. ध्रुव जुरेल आणि पदार्पण करणारा सारांश जैन खेळपट्टीवर उपस्थित असून ऋषभ पंत रिटायर्ड हर्ट झाल्याने तो पुन्हा फलंदाजीला येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भारताची धावसंख्या 400 पार जाण्याची दाट शक्यता आहे. या डावात श्रीलंकेकडून सर्वाधिक विकेट्स असिथानेच घेतल्या. त्याने तीन विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---