---Advertisement---

Colombo Test: देवदत्त पडिक्कलचे सलग दुसरे शतक, चेतेश्वर पुजाराच्या 8 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची केली पृनरावृत्ती!

On: रविवार, ऑगस्ट 23, 2026 6:32 PM
---Advertisement---

श्रीलंका दौऱ्यात देवदत्त पडिक्कलचा धमाका सुरूच आहे. त्याने लागोपाठ दुसरे शतक करत विरोधी संघाच्या अडचणीत वाढ केली आहे. साई सुदर्शनच्या दुखापतीमुळे या मालिकेत पडिक्कला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने करत एका विशेष विक्रमाची बरोबरी केली आहे.

श्रीलंका आणि भारत यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत भारत आघाडीवर असून दुसऱ्या सामन्याला आज (रविवारी, 23 ऑगस्ट) कोलंबोमध्ये सुरूवात झाली आहे. या सामन्यातही पडिक्कलने शतकी खेळी करत तिसऱ्या क्रमांकावरील आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. त्याचबरोबर जवळपास आठ वर्षांत प्रथमच असे घडले, एखाद्या भारतीय फलंदाजांने तिसऱ्या क्रमांकावर परदेशात सलग दोन शतके झळकावली.

पडिक्कलने गॉल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 167 धावांची खेळी केली होती. त्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी (15 ऑगस्ट) त्याने 100 धावांचा टप्पा गाठला होता. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलेच शतक ठरले होते. आता त्याने कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (SSC) मैदानावर कामगिरीमध्ये सातत्य राखत पुन्हा एकदा शतकी खेळी केली आहे.

दुसऱ्या सामन्यात पडिक्कला 0 आणि 1 धावसंख्येवर असताना जीवदान मिळाले होते, त्याने अजिंक्य राहत शतकी खेळी केली. त्याचबरोबर त्याने कर्णधार शुबमन गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 120 धावांची आणि रवींद्र जडेजासोबत पाचव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. पडिक्कल 193 चेंडूंत 12 चौकारांच्या सहाय्याने 117 धावा करत बाद झाला.

पडिक्कलने पुजाराच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली
पडिक्कलने या सामन्यात शतक करताना एक विशेष कामगिरी केली आहे. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या इतर कोणालाही मागील 8 वर्षांत न जमलेला कारनामा केला आहे, तो सलग कसोटी सामन्यांमध्ये शतकी खेळी करणारा माजी भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारानंतरचा पहिला भारतीय ठरला आहे.

भारताच्या तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाने परदेशातील सलग कसोटी सामन्यांमध्ये शतके झळकावण्याची यापूर्वीची घटना 2018-19 च्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत (BGT) पाहायला मिळाली होती. तेथे पुजाराने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) 106 आणि 0 धावा केल्या होत्या, त्यानंतर सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) 193 धावांची खेळी केली होती.

पडिक्कने पुजाराच्या कामगिरीची पुनरावृत्ती करत तिसऱ्या क्रमांकावरील आपले स्थान आणि पुजाराचा उत्तराधिकारी म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. SL vs IND Colombo Test: Devdutt Padikkal scores his second consecutive century, equalling Cheteshwar Pujara record set eight years ago)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---