भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) तुलना जगातील सर्वोत्कृष्ट महान गोलंदाजांमध्ये केली जाते. जसप्रीत बुमराह हा भारताचा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहे. ही चर्चा सध्या सर्वत्र आहे. बुमराह ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे, त्यावर विश्वास न ठेवण्याचे कोणतेही ठोस कारण दिसत नाही. पण वेस्ट इंडिजचा महान वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्ट्सचे (Andy Roberts) मत वेगळे आहे. त्याच्या मते, अलीकडच्या काळात बुमराह नव्हे तर मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज ठरला आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) 2023 मध्ये दुखापतीतून परतला. 2024च्या टी20 विश्वचषकात तो टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. एवढेच नाही तर त्याने आपल्या कामगिरीने भारताला अनेक कसोटी सामने जिंकून दिले. महान फलंदाज सुनील गावस्कर देखील त्याला कारकिर्दीतील सर्वात कठीण गोलंदाज मानतात. पण रॉबर्ट्सने शमीला बुमराहच्या वर स्थान दिले आहे.
अँडी रॉबर्ट्सने यामागचे कारणही स्पष्ट केले आहे. तो म्हणतो की, अलीकडच्या काळात शमी भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या दृष्टीने हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज पूर्ण पॅकेज गोलंदाज आहे. फिटनेसशी संबंधित समस्यांमुळे शमी सध्या संघाबाहेर आहे. पण रॉबर्ट्सचे मत आहे की शमीचा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात लवकरात लवकर समावेश करण्यात यावा. राॅबर्ट त्याला सिराजपेक्षा श्रेष्ठ मानतो.
मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्राशी खास संवाद साधताना अँडी रॉबर्ट्स म्हणाला, “शमी हा अलीकडच्या काळातील भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. त्याला बुमराहइतके विकेट्स मिळाले नसतील, पण तो एक संपूर्ण पॅकेज आहे आणि इतर गोलंदाजांपेक्षा तो अधिक सातत्यपूर्ण गोलंदाजी करतो. शमी चेंडू स्विंग करतो, शमी चेंडू सीम करतो. शमीचे चेंडूवरचे नियंत्रण बुमराहइतकेच चांगले आहे. शमीला खेळायलाच हवे. मोहम्मद सिराज मोहम्मद शमीच्या जवळपासही नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
नव्या वर्षात टीम इंडियाचा पहिला सामना कोणाशी? पाहा संपूर्ण वेळापत्रक
आयसीसीची मोठी कारवाई! या लीगवर अचानक बंदी घातली, दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश!
संघाचा मोठा निर्णय, हा खेळाडूचं असणार 2025 पर्यंत हेड कोच!





