---Advertisement---

IPL 2025: पंजाब – दिल्ली रद्द झालेला सामना आता ‘या’ ठिकाणी! BCCIचा मोठा निर्णय

On: मंगळवार, मे 13, 2025 8:52 AM
---Advertisement---

बीसीसीआयने सोमवार (12 मे) रोजी आयपीएल 2025 स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नव्या वेळापत्रकानुसार बाकीचे सामने 17 मे रोजी पासून खेळले जातील. तसेच अंतिम सामना 3 जून रोजी खेळला जाईल. नव्या वेळापत्रका अंतर्गत हे देखील स्पष्ट केले आहे की, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स रद्द झालेला सामना आता पुन्हा खेळला जाणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये 24 मे रोजी खेळला जाईल. स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यानंतर पंजाब किंग्स त्यांचे सर्व उर्वरित सामने जयपूरच्या मैदानावरच खेळणार आहे.

पंजाब आणि दिल्ली संघांमध्ये 7 मे रोजी धर्मशालामध्ये खेळला गेलेला सामना भारत आणि पाकिस्तान मधील तणावाच्या कारणाने मध्येच थांबवण्यात आला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी बीसीसीआयने मोठा निर्णय घेत स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित केली होती. पण आता युद्धाला पूर्णविराम लागल्यानंतर बीसीसीआयने स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नवीन वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. धर्मशाळामध्ये स्थगित करण्यात आलेला सामना 10.2 षटकांवरच रद्द केला होता.

त्या सामन्यात संघासाठी सलामीवीर फलंदाज प्रभसीमरन सिंग आणि प्रियांश आर्यने शानदार पारी खेळली होती. पण आता त्यांना पुन्हा सुरुवात करावी लागणार आहे. हा सामना 24 मे रोजी खेळला जाईल आणि प्लेऑफच्या दृष्टीने सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. स्पर्धा स्थगित केल्यानंतर 10 दिवसांच्या मोठ्या अंतराने स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मोठ्या अंतरामुळे दोन्ही संघातील खेळाडू प्रशिक्षक आणि स्टाफ यांच्या उपलब्धतेत मोठा फरक पडू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---