---Advertisement---

विराटच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर बीसीसीआयची मोठी प्रतिक्रिया समोर!

---Advertisement---

विराटने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याचाच अर्थ भारतीय क्रिकेट बोर्ड बीसीसीआय त्याला निवृत्तीच्या घोषणेबद्दल अडवू शकली नाही. आता तुम्ही विचार कराल की, असं का? काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची गोष्ट बीसीसीआयला आधीच केली होती. पण बीसीसीआयने त्याला या निर्णयावर विचार करण्याची संधी दिली होती.

पुन्हा ही गोष्ट समोर आली की, बीसीसीआय विराटला इंग्लंड दौऱ्यावर कर्णधार पद सोपवणार होते. पण विराटने आज म्हणजेच सोमवार 12 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

विराटने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआयची प्रतिक्रिया समोर आली आहे. थँक्यू विराट कोहली. कसोटी क्रिकेटमध्ये एका मोठ्या युगाचा शेवट झाला, पण तुझी खेळी कायमच स्मरणात राहील. टीम इंडियाचा माजी खेळाडू कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने टीम इंडियासाठी दिलेले योगदान कायमच लक्षात ठेवलं जाईल.

याआधी भारताचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तसेच आता विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दोघांनी ठीक इंग्लंड दौऱ्याआधी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय संघाला पुढच्या महिन्यात त्याची सुरुवात पासून होईल.

2011 मध्ये भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने 123 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 46.85 च्या सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर 7 डबल शतक, 30 शतक आणि 31 अर्धशतक आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 जानेवारी 2025 मध्ये शेवटची कसोटी पारी खेळली होती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---