भारताचा महान खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. हा निर्णय त्याने इंग्लंड दौऱ्याआधी दिला आहे. भारतीय संघ 20 जून पासून इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथे त्यांना पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ज्यामध्ये विराट कोहलीचा खेळण पक्क मानलं जात होतं, परंतु त्याने टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता रोहित शर्मा नंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने टी20 मधून निवृत्ती घेतल्यानंतर आता 11 महिन्यानंतर कसोटीच्या निवृत्तीची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
विराटच्या निवृत्तीनंतर पूर्ण भारत देश खूप भावुक झाला आहे आणि आता लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा करत आहेत. ऑस्ट्रेलिया मालिकेत दरम्यान पर्थमध्ये विराटने त्याची शेवटची सेंचुरी झळकावली होती. यावर एका युजरने लिहिले आहे, ऑस्ट्रेलिया नाही इंग्लंड विरुद्ध शेवटची सेंचुरी झळकावून तुझ्या करिअरला शेवट करायचा होता. चिकू एवढ्या लवकर का? एकाने लिहिले आहे, क्रिकेटच्या विश्वातील एक मोठा तारा आता खेळताना दिसणार नाही. एका युगाचा शेवट. धन्यवाद विराट कोहली. आता कसोटी क्रिकेट पहिल्यासारख राहणार नाही जसं विराट होता तेव्हा होतं.
आता पुन्हा कधीच कसोटी क्रिकेट तू होतास तसं असणार नाही, काही जणांनी म्हटलेलं आहे, “अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही”.
एका चाहत्याने लिहिलेलं आहे की, मी खरंच आशा करत होतो की, इंग्लंड मालिकेदरम्यान विराटने फक्त एकदा सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावे. मला अभिमान आहे की, मी त्याला कसोटी टीममध्ये खेळताना पाहिलं आहे. एकाने लिहिलं आहे, जेव्हा बॉर्डर जावस्कर ट्रॉफी 2025 संपली तेव्हा तीन खेळाडूंनी निवृत्ती घेतली. आधी आर अश्विन नंतर रोहित आणि आता विराट कोहली. या दिग्गजांच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटला मोठा फटका बसला आहे.






