---Advertisement---

फुटबॉलमय मॉस्कोत भारतीय ध्वज घेऊन फिरतोय फुटबॉल वेडा भारतीय

On: शनिवार, जून 16, 2018 9:30 AM
---Advertisement---

मॉस्को। 21 व्या फिफा विश्वचषकाला 14 जूनपासून मॉस्कोत सुरवात झाली. या स्पर्धेत भारतीय संघ पात्र जरी ठरला नसला तरी या भारतात या स्पर्धेचे खूप चाहते आहेत.

ते त्यांच्या आवडत्या संघाला वेळोवेळी पाठींबाही देत असतात. असाच एक फुटबॉलचा भारतीय चाहता थेट रशियाला ही स्पर्धा पाहण्यासाठी गेला आहे. त्या चाहत्याचे नाव आहे अतुल कसबेकर.

भारतात फोटोग्राफी क्षेत्रात मोठं नावं असलेला आणि बॉलिवूड चित्रपट निर्माता आसणाऱ्या अतुलला फुटबॉल सामने पहायला आवडते. तो आर्सेनल फुटबॉल क्लबचा मोठा चाहता आहे. 

त्यामुळे तो फुटबॉलच्या प्रेमापोटी फिफा विश्वचषक पहायला रशियात गेला आहे. त्याने याचा व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाउंट वरुन शेअर केला आहे.

या व्हिडिओत तो भारताचा तिरंगा पाठीवर घेऊन फिरत आहे. तसेच त्याने या व्हिडिओला कॅप्शन देताना 2026 ला होणाऱ्या 23 व्या फिफा विश्वचषकात भारतही पात्र होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘स्पर्धेसाठी पात्र ठरला नसला तरी सावध रहा भारताचा वेडा फुटबॉल चाहता तिरंगा घेऊन फिरत आहे. भारतीय संघ लवकरच या स्पर्धेसाठी पात्र ठरेल. 2026 ला अमेरिकेत होणाऱ्या फिफा विश्वचषकासाठी भारताने पात्र ठरावे’

अतुल बॉलिवूडच्या निरजा आणि तुम्हारी सुलु या चित्रपटाचा निर्माता आहे.

भारतीय फुटबॉल संघाने नुकतेच इंटरकॉन्टीनेंटल कप स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेसाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत भारतीय संघाला पाठींबा दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

बर्थडे बॉय मोहम्मद सालाह विश्वचषक पदार्पणासाठी सज्ज

२ वेळचा विजेता बलाढ्य उरूग्वे आज लढणार बर्थडे बॉय सालाहच्या इजिप्तशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment