फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022च्या स्पर्धेत आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहेत. शुक्रवारी (2 डिसेंबर) उशिरा रात्री (12.30) ग्रुप जी मध्ये ब्राझील विरुद्ध कॅमेरून (Brazil vs Cameroon) सामना लुसेल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात कॅमेरूनने रोमांचक विजय मिळवत सगळ्यांना आश्चर्यचकित केले. मात्र हा सामना जिंकून सुद्धा कमॅरूनला सुपर 16मध्ये जाता आले नाही आणि ब्राझीलने अधिकृतपणे पुढची फेरी गाठली.
फिफा विश्वचषकाचा पाच वेळेचा विजेता ब्राझीलने साखळी फेरीचा अंतिम सामना कॅमेरुन विरुद्ध 0-1 असा गमावला. हा गोल कॅमेरूनच्या विन्सेंट अबुबकर (Vincent Aboubakar) याने अतिरिक्त वेळेत केला. या विजयाबरोबरच कॅमेरून विश्वचषकाच्या इतिहासात पहिला आफ्रिकी संघ ठरला ज्यांनी ब्राझीलचा पराभव केला. त्यांच्या या थरारक विजयाने ते पुढील फेरीत पोहोचले नाही.
विन्सेंटने सामन्याच्या 92व्या मिनिटाला गोल केला आणि त्याने विचित्र सेलेब्रेशन केल्याने त्याला पुढच्याच मिनिटाला रेड कार्ड मिळाले, मात्र हा सामना चाहते कधीच विसरणार नाही.
A story in four parts.
This #FIFAWorldCup Group Stage is providing drama right until the very end! pic.twitter.com/v7iviclvYH
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 2, 2022
ब्राझीलने आधीच अंतिम 16मध्ये जागा पक्की केली होती. यामुळे त्यांनी या सामन्यात बाकावरील बाकी खेळाडूंना संधी दिली होती, जी पराभवाचे मुख्य कारण ठरली. त्याचबरोबर तब्बल 24 वर्षानंतर ब्राझीलने विश्वचषकाच्या साखळी फेरीतील सामना गमावला. याआधी त्यांनी 1998च्या विश्वचषकात नॉर्वे विरुद्ध 1-2 असा सामना गमवावा लागला होता. सुपर 16मध्ये ब्राझीलचा सामना दक्षिण कोरियाविरुद्ध 6 डिसेंबरला आहे.
🇨🇲 Cameroon v 🇧🇷 Brazil did not let us down with the drama 🔥
See highlights on FIFA+
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 2, 2022
या स्पर्धेत हा काही पहिलाचा उलटफेर नव्हता. ब्राझीलच्या आधी अर्जेंटिना, जर्मनी, बेल्जियम, पोर्तुगल आणि फ्रांस यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला बेल्जियम आणि चार वेळेचा विश्वविजेता जर्मनी तर या हंगामात साखळी फेरीतूनच बाहेर झाले आहेत.
Cameroon go out with their heads held high! 🇨🇲
An incredible climax to an outstanding Group Stage… 🤩@adidasfootball | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 2, 2022
दुसरीकडे स्वित्झर्लंडने सर्बियाचा 3-2 असा पराभव केला आणि अंतिम 16मध्ये प्रवेश निश्चित केला. ग्रुप जी च्या गुणतालिकेत ब्राझील आणि स्वित्झर्लंडचे अंक प्रत्येकी 6-6 आहेत, मात्र गोल फरकाने ब्राझील पहिल्या स्थानावर आहे. कॅमेरून 4 अंकासोबत तिसऱ्या आणि सर्बिया एका अंकासह चौथ्या स्थानावर आहे. स्वित्झर्लंड 7 डिसेंबरला पोर्तुगलशी भिडणार आहे. Because of Vincent Aboubakar late goal Cameroon Defeat Brazil in FIFA World Cup 2022
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
…तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता! ब्रॅडमन अन् ध्यानचंद यांच्या भेटीचा रोमांचक किस्सा
रोहित आणि विराटमधील वादावर शास्त्रींनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ते दोघे तिकडे..’