भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची फलंदाजी सर्वांनाच माहिती आहे. अर्थातच त्याने त्याच्या षटकारांच्या मदतीने केलेल्या धावा सर्वांनाच आकर्षित करतात. अशीच कामगिरी त्याने मागील वर्षी झालेल्या विश्वचषकात केली होती. परंतु त्याने चांगली फलंदाजी करूनही भारतीय संघाला अंंतिम फेरीत प्रवेश करता आला नव्हता.
तरीही २०१९ विश्वचषकात सुरुवातीपासूनच भारतीय संघ कठीण परिस्थितीतून जात होता. परंतु रोहित शर्माच्या फलंदाजीमुळे संघाला विश्वचषकाच्या उपांंत्य फेरीपर्यंत मजल मारता आली होती.
सलामीवार फलंदाज रोहित २०१९ चा विश्वचषक जवळपास विसरला असेल. परंतु २०११ चा विश्वचषक रोहित आजपर्यंत विसरला नाही. भारतात झालेल्या २०११च्या विश्वचषकात रोहित भारतीय संघाचा भाग नव्हता. आता यामागचे कारण त्याने १० वर्षांनंतर स्पष्ट केले आहे.
इंग्लंड संघाचा माजी फलंदाज केविन पीटरसनबरोबर (Kevin Pietersen) इंस्टाग्रामवरील लाईव्ह चॅटमध्ये रोहितने आपल्या कारकीर्दीतील सर्वात वाईट काळाबद्दल सांगितले आहे.
रोहित यावेळी म्हणाला की, “२०११ च्या विश्वचषकात भारतीय संघात स्थान न मिळणे हा त्याच्या कारकीर्दीतील सर्वात वाईट काळ होता. हा विश्वचषक भारतात सुरु होता.”
तसेच विश्वचषकाचा अंतिम सामना रोहितच्या घरच्या मैदानावर सुरु होता. भारतीय संघाने २ एप्रिल २०११ला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये विश्वचषकावर दुसऱ्यांदा आपले नाव कोरले होते.
मुंबईच्या रोहितने सांगितले की, त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला विश्वचषकात स्थान मिळाले नाही.
रोहितने २०१५ आणि २०१९ या दोन वर्षात झालेल्या विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. विश्वचषकात त्याने ६ शतक केले आहेत. ज्यातील ५ शतक त्याने २०१९ च्या विश्वचषकात ठोकले होते.
सध्या रोहित दुखापतग्रस्त आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यात टी२० मालिकेदरम्यान तो जखमी झाला होता. आशा आहे की आयपीएलमधून तो पुनरागमन करेल. परंतु कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
ट्रे़ंडिंद घडामोडी-
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
-टीम इंडियाविरुद्ध पराभूत झाल्यावर या कारणामुळे पाॅटींग सोडले होते कर्णधारपद
-सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे ५ कर्णधार, धोनी नाही तर हा भारतीय आहे टाॅप५मध्ये