---Advertisement---

बीड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा संपन्न.

On: सोमवार, डिसेंबर 2, 2019 2:32 PM
---Advertisement---

पाटोदा दि. २ कबड्डी खेळाडूंसाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील महासांगवी येथे बीड जिल्हा कबड्डी असोसिएशन व जय हनुमान क्रिडा मंडळ महासांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० आँक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हा निवड व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. प्रकाश झोतातील सामने पाहण्यासाठी महासांगवीतील महिलां प्रेक्षक व कबड्डी रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

बीड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना नेहमीच प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले आहे. यातूनच जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कबड्डीच्या माध्यमातून जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. याचाच परिणाम म्हणून शासनाच्या वन, पोलीस, क्रीडा, आणि समाज कल्याण च्या अशा विविध क्षेत्रात त्यांना प्रवेश मिळवता आला आहे.

तरुण खेळाडूंच्या जीवनाची वाट यशस्वी करण्यासाठी बीड जिल्हा कबड्डी असोसिएशनने मोलाचा वाटा उचललेला आहे. जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना घडवण्यात असोसिएशनचा मोठे योगदान आहे. २०१९- २० च्या जिल्हा निवड चाचणी आणि अजिंक्यपद स्पर्धा पाटोदा तालुक्यातील महासांगवी असोसिएशनच्या वतीने घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये जवळपास पन्नास संघांनी विविध गटांमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी विविध संघांतील खेळाडूंनी उत्कृष्ट कबड्डी खेळत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी महासांगवी आणि परिसरातील क्रीडाप्रेमी रसिक आणि महिला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

या स्पर्धेमध्ये किशोर गटात मुलाच्या संघातून धस दादा स्पोर्ट्स अकॅडमी यांनी विजेता क्रमांक तर गेवराईच्या जय हिंद क्रीडा मंडळाने उपविजेता क्रमांक पटकावला तर मुलीच्या गटांमध्ये कालिका देवी क्रीडा मंडळ शिरूर कासार संघाने विजेता तर जय भवानी क्रीडा मंडळ आष्टी च्या संघाने उपविजेता क्रमांक पटकावला. कुमार गटात मुलांमधून जय हनुमान क्रीडा मंडळ महासांगवी विजेता तर धस दादा अकॅडमीने उपविजेता क्रमांक पटकावला. खुल्या गटातून जय हनुमान क्रीडा मंडळ महासांगवी ने विजेता तर ढेकणमोहा येथील कबड्डी संघाने उपविजेता क्रमांक पटकावला. यावेळी विजेत्या संघांना व पुढील संघात निवड झालेल्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धा स्पर्धांना माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी सभापती महेंद्र गर्जे आदी मान्यवरांनी भेटी दिल्यामुळे खेळाडूंचा उत्साह वाढला होता. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मधुकर तात्या गर्जे, प्राचार्य डॉ. विश्वास कदम,डॉ. भीमराव माने, प्रा ब्रह्मनाथ मेंगडे, डॉ. केतन गायकवाड, डॉ. भागचंद सानप, अभिजित तांदळे, नितीन निमोनकर, अशोक जगदाळे, अनिल जगदाळे यांच्यासह महासांगवी येतील कबड्डी रसिक आणि जय हनुमान क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---