---Advertisement---

रिषभ पंत ज्या सामन्यात खेळत होता त्याच सामन्यात झाला मधमाशांचा हल्ला

---Advertisement---

तिरूअनंतपूरम। भारत ए विरुद्ध इंग्लंड लायन्स संघात काल (29 जानेवारी) चौथा वन-डे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत 5 सामन्यांच्या वन-डे मालिका 4-0 अशी विजयी आघाडी मिळवली.

या सामन्यात भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतने नाबाद अर्धशतकी तर दिपक हुडाने नाबाद 47 धावांची खेळी केल्याने संघाच्या विजयात महत्त्वाची भुमिका पार पाडली.

तत्पूर्वी इंग्लंड संघ फलंदाजी करत असताना 28व्या षटकात सामना 15 मिनिटे थांबवला गेला होता. मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे हा सामना थांबवला गेला.

या हल्ल्यात 5 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर खेळाडू आणि संघाच्या सपोर्ट स्टाफपैकी कोणालाही दुखापत झाली नाही. यावेळी भारत ए चे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही मैदानाच्या स्टाफला मदत केली.

“ही एक विचित्र घटना होती. आम्ही ज्या गॅलरीत प्रेक्षक बसले होते ती स्वच्छ केली होती. पण त्याच्यावरच्या गॅलरीत जाण्याची कोणालाही परवानगी नव्हती. तेथूनच कोणीतरी मस्करी केली असावी. कारण तिकडूनच मधमाश्यांचा हल्ला झाला”, असे स्पोर्ट्स फॅक्लटीचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अजय पद्मनाभन म्हणाले.

भारताने ही मालिका अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालीच 3-0ने जिंकली होती. तर उर्वरीत 2 सामन्यात अंकित बावणे भारताचा कर्णधार आहे.

यावेळी इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी 8 विकेट्स गमावत 221 धावा केल्या होत्या.

भारताकडून या सामन्यात शार्दुल ठाकुरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. राहुल चहरने 2 आणि आवेश खानने 1 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. फलंदाजीत केएल राहुलने 47 धावा करता भारताला चांगली सुरूवात करून दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीच्या दुखापतीबद्दलची ताजी अपडेट, वनडे समावेशाबद्दल झाला मोठा निर्णय

रोहितने जर ही गोष्ट केली तर ठरणार सर्वात लकी भारतीय

या कारणामुळे टीम इंडिया आणि पाकिस्तान विश्वचषकात वेगळ्या ग्रुपमध्ये

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment