यावर्षी भारतीय संघ दोन मोठ्या स्पर्धा खेळणार आहे. यामध्ये आशिया चषक आणि वनडे विश्वचषक 2023 स्पर्धांचा समावेश आहे. या स्पर्धांच्या तयारीला भारतीय संघाने सुरुवात केली आहे. यासाठी भारतीय निवडकर्त्यांनी विश्वचषकासाठी 18 खेळाडूंची निवड केली आहे, ज्यातील 17 खेळाडूंना आशिया चषकासाठी निवडले गेले आहे. या स्पर्धेपूर्वी खेळाडूंच्या शारीरिक फिटनेससोबतच अंतर्गत फिटनेस टेस्ट केली जाईल, त्यासाठी खेळाडूंचे रक्तही तपासले जाईल.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह सर्वांची फिटनेस टेस्ट
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतरपासूनच बीसीसीआयने या मोहिमेसाठी 13 दिवसांचा कार्यक्रम आखला होता. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनंतर आयर्लंड दौऱ्यावर गेलेले खेळाडू सामील झाले नाहीत. त्यांना या दौऱ्यानंतरच ही टेस्ट द्यावी लागेल.
खेळाडूंच्या शारीरिक आणि अंतर्गत फिटनेस चाचणी
माध्यमांतील वृत्तांनुसार, या फिटनेस टेस्टमध्ये खेळाडूंच्या संपूर्ण शरीराची चाचणी होईल. यामध्ये त्यांच्या रक्ताचाही समावेश आहे. याव्तिरिक्त बीसीसीआयचे प्रशिक्षक खेळाडूंच्या शीरीरिक फिटनेसची चाचणी घेतील. जे खेळाडू फिटनेसची मानके पार करू शकणार नाहीत, त्यांना विश्वचषकापूर्वी दुरुस्त करण्यासाठी खास फिटनेस आणि डाएट वेळापत्रक बनवला जाईल.
विश्वचषकापूर्वी बीसीसीआयला घ्यायची नाही कोणतीही जोखीम
बीसीसीआयला विश्वचषकात खेळाडूंच्या फिटनेसबाबत कोणतीही जोखीम घ्यायची नाहीये. तसे पाहिले, तर यामधील अधिकतर टेस्ट अशा आहेत, ज्या बोर्ड वेळोवेळी नियमितरीत्या करून घेते. मात्र, विश्वचषकापूर्वी याचे महत्त्व आणखी वाढले आहे.
रक्ताच्या चाचणीवर असेल जास्त भर
वृत्तसंस्था पीटीआयच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “होय, ज्या खेळाडूंनी नुकतीच आयर्लंड मालिका खेळली आहे (जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन), त्यांना सोडून अधिकतर खेळाडूंचे नियमित फिटनेस परीक्षण बंधनकारक रक्ताच्या चाचणीसोबत केले जाईल.” ज्या मापदंडांची चाचणी केली जाईल, त्यात लिपिड प्रोफाईल, रक्तातील साखर (फास्ट आणि पीपी), यूरिक ऍसिड, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12 आणि डी, क्रिएटिनिन, टेस्टोस्टेरॉन यांचा समावेश आहे. अनेकदा डेक्सा टेस्टही होते. ही हाडांची घनता तपासण्यासाठी एक प्रकारचा स्कॅन आहे.
खेळाडूंसाठी खास प्रशिक्षण आणि डाएट कार्यक्रम
बीसीसीआयच्या फिटनेस कार्यक्रमाचा उद्देश खेळाडूंना त्यांच्या सर्वोत्तम आकारात ठेवणे आहे. यामुळे त्यांना दुखापतीपासून वाचवले जाऊ शकेल, जे त्यांच्या विश्वचषक अभियानावर परिणाम करतील. हा फिटनेस कार्यक्रम एनसीएने फिजिओथेरपिस्ट आणि प्रशिक्षकांसोबत मिळून बनवला आहे. या आधारावर खेळाडूंना निश्चित प्रशिक्षण आणि डाएट कार्यक्रम दिला गेला आहे. याव्यतिरिक्त त्यांना दररोज 9 तासांची झोप घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
BCCI designed a program chart during the 2 week break for players who weren't part of the IRE series [The Indian Express]
– 9 hours of sleep
– Gym
– Walking
– Yoga
– Swimming
– Certain amounts of protein dailyBCCI wants all players to be fit for the next 3 months. pic.twitter.com/doHZanVlUc
— Johns. (@CricCrazyJohns) August 24, 2023
खेळाडूंच्या ताकदीवर आणि स्नायूंवर भर
या फिटनेस कार्यक्रमात खेळाडूंची ताकद आणि हालचाल, खांदा आणि ग्लूट स्नायू फिट ठेवण्याशी संबंधित व्यायामाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त खेळाडूंच्या डाएटमध्ये निश्चित प्रोटीनचे सेवन, दररोज जिम सत्र, योगा, चालणे, धावणे, पोहण आणि मालिशचे खास सत्र ठेवण्यात आले आहेत. खेळाडूंना त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या आधारावरही विशेष सूचनाही देण्यात आल्या आहेत. (before 2023 world cup and asia cup indian players to undergo special fitness test at alur camp report read)
हेही वाचा-
क्रिकेटप्रेमींनो सज्ज व्हा! वर्ल्डकप 2023ची तिकीटे ‘या’ तारखेपासून करता येणार बुक, लगेच वाचा
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत बुमराहने घडवला इतिहास, बनला ‘अशी’ कामगिरी करणारा फक्त 5वा भारतीय कर्णधार