भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आपल्या प्रदर्शनापेक्षा संघातून वगळल्यामुळे अधिक चर्चेत राहिला आहे. 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या या खेळाडूला अतापर्यंत खूपच कमी संधी मिळाल्याचे पाहायला मिळाले. आशिया चषक 2023 मध्येही सॅमसनसोबत निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले गेले, असे चाहत्यांना वाटत आहे. अशातच सोशल मीडियावर त्याच्या एका व्हायरल फोटोमुळे चा चर्चांना अधिकच उधान आले आहे.
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाजू संजू सॅमसन नुकत्याच पार वडेल्या वेस्ट इंडीज आणि आयर्लंड दौऱ्यात संघासोबत होते. वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसरा वनडे सामन्यात त्याने अर्धशतक केले होते. तरत आयर्लंडविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात त्याने 40 धावांची खेली केली होती. सॅमसनची वनडे क्रिकेटमधील आकडेवारी समाधानकारक राहिली आहे. पण तरीही आशिया चषक 2023 साठी त्याला संधी दिली गेली नाही. त्याला आशिया चषकासाठी राखीव खेळाडू म्हणून संघात घेतले गेले आहे.
आशिया चषकापूर्वी भारतीय खेळाडूंचा फोटो शूट पार पडला. सॅमसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून फोटोशूटमधील एकही फोटो शेअर केला नाहीये. मात्र राजस्थान रॉयल्स आयपीएल संघाच्या अधिकृत सोशल मीडियावर सॅमसनचा एक फोटो शेअर केला गेला आहे. या फोटोत सॅमसन जराही हसताना दिसत नाहीये. याच कारणास्तव चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशात अनेकांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, सॅमसन त्याला संधी मिळत नसल्यामुळे खूपच नाराज दिसत आहे.
https://www.instagram.com/p/Cwm-t8rMGAZ/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान, आशिया चषकातील आपल्या अभियानाची सुरुवात भारतीय संघ शनिवारी (2 सप्टेंबर) करेल. या सामन्यात यजमान भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघ विरोधात असेल. चाहते मागच्या काही महिन्यांपासून या सामन्याची वाट पाहत आहेत. (Before Asia Six, Sanju Samson’s special photo went viral on social media)
आशिया चषक 2023 साठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्ण.
राखीव खेळाडू – संजू सॅमसन.
महत्वाच्या बातम्या –
‘सन 2011 नंतर हा भारताचा…’, भारत-पाक सामन्यापूर्वी शास्त्री गुरुजींचे Team Indiaविषयी सनसनाटी विधान
बांगलादेशला हरवल्यानंतर श्रीलंकन कर्णधाराने वाचला कौतुकाचा पाढा, धोनीच्या आवडत्या खेळाडूबद्दल म्हणाला…