सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू वनडे मालिका सुरू आहे. यानंतर जगातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित टी20 लीग म्हणजे आयपीएल 2023 स्पर्धेची सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 31 मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र, या स्पर्धेबाबत सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे. आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने अचानक त्यांच्या ताफ्यात पाकिस्तानच्या दोन खेळाडूंना सामील केले आहे. संघातील पाकिस्तानी खेळाडूंच्या एन्ट्रीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. मुंबई इंडियन्सने एक असा निर्णय घेतला, ज्याने चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊयात.
खरं तर, न्यूयॉर्कमध्ये मेजर लीग क्रिकेट (Major League Cricket) स्पर्धेच्या पहिल्या वहिल्या हंगामाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये आयपीएल (IPL) फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचाही एक संघ असणार आहे. या संघाचं नाव एमआय न्यूयॉर्क (MI New York) असे आहे. सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने पोस्ट शेअर केली आहे. यामधून त्यांनी पाकिस्तानी खेळाडू हम्माद आझम आणि एहसान आदिल (Pakistani Players Hammad Azam And Ehsan Adil) यांना संघात सामील केल्याची माहिती दिली आहे.
Welcome to the #OneFamily 💙
Here are our @MINYCricket picks for the inaugural @MLCricket draft 😍#MumbaiIndians #MINewYork pic.twitter.com/pJ41MCmWJV
— Mumbai Indians (@mipaltan) March 20, 2023
खरं तर, ही स्पर्धा यावर्षी जुलै महिन्यात यूएसएमध्ये खेळली जाणार आहे. लीगमध्ये या दोन्ही खेळाडूंना सामील करण्यात आले आहे. आपली कारकीर्द घडवण्यासाठी हे दोन्ही खेळाडू यूएसएला गेले होते.
पाकिस्तान संघासाठी खेळलेत दोन्ही खेळाडू
मुंबई इंडियन्सच्या न्यूयॉर्क संघामध्ये सामील करण्यात आलेले दोन्ही खेळाडू पाकिस्तान संघाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळले आहेत. हम्माद आझम (Hammad Azam) याने पाकिस्तानकडून 2011 ते 2015दरम्यान 11 वनडे आणि 5 टी20 सामने खेळले होते. हम्मादने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2015मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. यासोबतच एहसान आदिल (Ahsan Adil) याने 3 कसोटी आणि 6 वनडे सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. एहसान 2015च्या आयसीसी विश्वचषकात पाकिस्तान संघाचा भाग होता.
पहिल्यांदा खेळली जातेय एमएलसी
अमेरिकेत पहिल्यांदाच मेजर लीग क्रिकेट स्पर्धा खेळली जात आहे. ही एक फ्रँचायझी आधारित स्पर्धा असेल. याचे आयोजन 13 ते 30 जुलैदरम्यान होईल. या स्पर्धेत 6 संघ भाग घेत आहेत. यामध्ये आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने न्यूयॉर्क संघ खरेदी केला आहे. तसेच, एमएलसी (MLC) स्पर्धेत शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या कोलकाता नाईट रायडर्सने लॉस एंजेलिस संघ विकत घेतला आहे. यूएसएने क्रिकेटमध्ये रस दाखवल्यामुळे ही स्पर्धा देशातील खेळाच्या भविष्यासाठी एक चांगली सुरुवात असल्याचे म्हटले जात आहे. (before ipl 2023 mumbai indians called two players from pakistan to win the trophy in MLC)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ना लाखो रुपये, ना कुठली गाडी! विलियम्सनला मालिकावीर पुरस्कारासाठी मिळालं भुवया उंचावणारं बक्षीस, पाहाच
पहिल्या हंगामातील विराट अन् स्मृतीची निराशाजनक आकडेवारी, वाचून RCBच्या चाहत्यांचंही दुखेल मन