2025च्या इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यापूर्वी एक मेगा लिलाव (Mega Auction) होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने (BCCI) नवीन नियम देखील जाहीर केले आहेत. तत्पूर्वी आयपीएल 2025 साठी खेळाडूंना कायम ठेवण्याची आणि सोडण्याची शेवटची तारीख (31 ऑक्टोबर) आहे. गुरूवारपर्यंत सर्व संघांना त्यांच्या कायम केलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. त्यापूर्वीच केकेआर (KKR) संघाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, कोलकाता संघ एकूण 5 खेळाडूंना कायम ठेवू शकतो.
आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मार्गदर्शनाखाली आणि श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखाली केकेआर संघाने इतिहास रचला होता. दरम्यान केकेआरच्या अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत केकेआरकडे खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
मात्र, आयएनएसच्या रिपोर्ट्सनुसार, कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संघात कायम ठेवले जाणार नाही. त्याला संघातून काढले जाऊ शकते. तर वेस्ट इंडिजचे 2 दिग्गज खेळाडू आंद्रे रसेल (Andre Russell) आणि सुनील नरेन (Sunil Narine) यांना कायम ठेवता येईल. याशिवाय रिंकू सिंह (Rinku Singh), वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि हर्षित राणा (Harshit Rana) यांनाही कायम ठेवण्यात येणार आहे. या 5 खेळाडूंना केकेआर संघ कायम ठेवू शकतो.
आगामी आयपीएल 2025च्या मेगा लिलावापूर्वी एकूण 6 खेळाडूंना कायम ठेवण्याचा नियम आहे. आरटीएम कार्डसह संघ एकूण 6 खेळाडूंना संघात कायम ठेवू शकतात. आता कोणता संघ कोणत्या खेळाडूला कायम ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs PAK; टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर, पण कर्णधाराचीच नाही केली घोषणा!
पंत नाही तर ‘हा’ होता, बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी जिंकवणारा खरा हीरो, दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य!
IND vs NZ; 24 वर्षांनंतर भारतीय संघाच्या नावावर होऊ शकतो, ‘हा’ नकोसा रेकाॅर्ड!