---Advertisement---

IPL 2025पूर्वी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का – महत्त्वाचा सदस्य झाला जखमी

Rahul Dravid
---Advertisement---

आयपीएलचा 18 वा हंगाम 22 मार्च पासून सुरू होणार आहे. परंतु आयपीएल 2025 च्या आधी राजस्थान रॉयल्ससाठी वाईट बातमी आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दुखापत झाली आहे. द्रविडच्या पायाला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीनेच पुष्टी केली आहे की राहुल द्रविड बुधवार (12 मार्च) रोजी सराव शिबिरात सामील होतील. परंतु, हंगाम सुरू होण्यापूर्वी द्रविडची दुखापत राजस्थान संघासाठी मोठा धक्का आहे. क्रिकेट खेळताना त्याला ही दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे.

“मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना बेंगळुरूमध्ये क्रिकेट खेळताना डाव्या पायाला दुखापत झाली. ते दुखापतीतून ठीक होत आहेत आणि आज जयपूरमध्ये संघाच्या प्रशिक्षण शिबिरात सामील होतील,” अशी माहिती राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने सोशल मीडियाद्वारे दिली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये द्रविड डाव्या पायावर प्लास्टर लावलेले दिसत आहे.

राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर मेगा लिलावापूर्वी द्रविड यांची आयपीएल 2025 साठी राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आगामी हंगामात द्रविड कर्णधार संजू सॅमसन आणि आरआरचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा यांच्यासोबत काम करताना दिसतील.

राजस्थान रॉयल्स आयपीएल 2025 मध्ये त्यांचा पहिला सामना (23 मार्च) रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. त्यांचा दुसरा सामना (26 मार्च) रोजी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होईल. राजस्थान रॉयल्स आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचले होते. राजस्थान क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानला एसआरएचकडून पराभव पत्करावा लागला. राजस्थानने शेवटचा 2022 मध्ये अंतिम फेरी गाठली होती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---