भारत आणि वेस्ट इंडीज (indi vs wi) यांच्यात फेब्रुवारी महिन्यात तीन सामन्यांची एकदिवसीय (odi series) आणि टी-२० मालिका (t20 series) खेळली जाणार आहे. बीसीसीआयने यासाठी भारतीय संघाची घोषणाही केली आहे. देशात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, आगामी मालिकेतही खेळाडूंना बायो बबलचे पालन करावे लागेल. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघ एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी अहमदाबादमध्ये एकत्र येईल आणि तीन दिवसांच्या विलगीकरणात राहिल.
वेस्ट इंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये खेळली जाणार आहे. त्यानंतर टी-२० मालिकेचे आयोजन कोलकातामध्ये केले गेले आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी बीसीसीआयकडून खेळाडूंना काही महत्वाच्या सुचना दिल्या गेल्या आहेत.
बीसीसआयच्या एका अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, “राहुलसह सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला १ फेब्रुवारीपर्यंत अहमदाबादमध्ये पोहचण्याचे आदेश दिले गेले आहेत. ते तीन दिवसांसाठी विलगीकरणात राहतील आणि त्यांची कोरोना चाचणी होईल. त्यानंतर एकदिवसीय मालिकेपूर्वी त्यांचा एक छोटा कँप होईल.”
व्हिडिओ पाहा- द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण
एकदिवसीय मालिकेपूर्वीचे भारतीय संघाचे नियोजन
संघातली सर्व खेळाडू १ फेब्रुवारीपर्यंत अहमदाबादमध्ये पोहोचतील.
-सपोर्ट स्टाफसह संपूर्ण संघाची कोरोना चाचणी केली जाईल आणि पुढे ते तीन दिवस विलगीकरणात राहतील.
-कोरोना चाचणीचे सर्वांचे अहवाल जर निगेटिव्ह आले तर, सर्व खेळाडू वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सहभाग घेतील. -तत्पूर्वी ४ फेब्रुवारीला त्यांच्यासाठी सराव शिबिराचे आयोजन केले जाईल.
-६ फेब्रुवारीला भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला सामना अहमदबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाईल.
-एकदिवसीय मालिका संपल्यानंतर खेळाडूंना टी-२० मालिकेपूर्वी एक छोटा ब्रेक दिला जाईल.
वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान.
वेस्ट इंडीविरुद्ध टी-२० मालिकेसाठी निवडला गेलेल्या भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, वाशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल.
महत्वाच्या बातम्या –
भारतीय क्रिकेटची ‘धाकड गर्ल’ शफाली वर्मा
नवे पर्व! पहिल्यांदाच ‘किंग कोहली’ खेळणार ‘हिटमॅन’च्या नेतृत्त्वाखाली; वर्षभरानंतर दिसणार ‘साथ-साथ’
व्हिडिओ पाहा –