कोरोना व्हायरसने केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात थैमान घातले आहे. गेल्या दीडवर्षापासून जगातील सर्व देश या महामारीच्या संकटाचा सामना करत आहेत. आत्तापर्यंत अनेक सेलिब्रेटीही कोरोनाच्या विळख्यात अडकल्या आहेत. यात आता भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा देखील कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे.
स्वतः सचिनने याबाबत माहिती देत म्हटले की, ‘माझा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. मी मागील काही काळापासून सतत चाचण्या करत होतो. काही सौम्य लक्षणे आढळल्याने मी स्वतःला घरातच क्वारंटाईन करून घेतले आहे. माझ्या कुटुंबातील इतर कोणालाही या आजाराची लागण झाली नाही.’
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021
मागील वर्षभरापासून जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या या साथीच्या आजाराच्या टप्प्यात यापूर्वीही अनेक क्रिकेटपटू आले आहेत. त्यातील बहुतांशी क्रिकेटपटू या आजारातून पूर्णपणे बरे होतात मैदानावर परतले आहेत.
आज आपण त्याच क्रिकेटपटूंविषयी जाणून घेऊया, ज्यांना या आजाराची लागण झाली होती
पाकिस्तानच्या दिग्गजांना झालेला कोरोना
पाकिस्तानचा माजी कर्णधार व दिग्गज अष्टपैलू शाहिद आफ्रिदी याला या आजाराची लागण झालेली. मागील वर्षी जून महिन्यात तो कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याने मैदानावर पडतात लंका प्रीमियर लीग, अबूधाबी टी१० लीग व पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. आफ्रिदीसह पाकिस्तानची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू सना मीर हिला देखील या आजाराने गाठले होते.
या खेळाडूंना झाले होते संक्रमण
न्यूझीलंडचा यष्टीरक्षक शाई होप, बांगलादेशचा माजी कर्णधार मशरफे मूर्तझा, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचे भाऊ शुभाशिष व इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली हे कोरोना संक्रमित झाले होते.
पाकिस्तानमध्ये माजी कर्णधार आणि विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनाही कोरोना झालेला. इम्रान यांच्या नेतृत्वात ११९२ मध्ये पाकिस्तानने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. अलीकडेच शादाब खान, हैदर अली यांच्यासह पाकिस्तानमधील सातहून अधिक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
या व्यतिरिक्त श्रीलंकेचा लाहिरू थिरिमाने, लाहिरू कुमारा, प्रशिक्षक मिकी आर्थर व डॅन वेन नीकर्क यांचाही कोरोना विषाणूची लागण झालेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत समावेश आहे.
या खेळाडूंचा झाला मृत्यू
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि यूपी सरकारचे मंत्री चेतन चौहान यांचे गेल्या वर्षी कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर निधन झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाकिस्तानचा प्रथमश्रेणी क्रिकेटर रियाज शेख याचाही कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याची बातमी आहे. पाकिस्तानचे प्रथमश्रेणी क्रिकेटपटू जफर सरफराज यांचेही कोरोनामुळे वयाच्या ५० व्या वर्षी निधन झाले. पेशावर क्रिकेटमध्ये सरफराज हे एक मोठे नाव मानले जात असे.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvENG: तिसऱ्या वनडेत ‘अशी’ असू शकते भारताची ‘प्लेइंग इलेव्हन’; दोघांना मिळू शकतो डच्चू
पुन्हा भारतीय संघात नाही दिसणार ‘हा’ फिरकीपटू, पुण्यात खेळला आपला अखेरचा सामना?
Video: मुंबई इंडियन्स फॅन्स, तुमच्या आवडत्या संघाची नवी जर्सी पाहिली का?