आयपीएलचा १७ वा हंगाम सुरू व्हायला अगदी आठवडा बरचं वेळ शिल्लक राहिला आहे. त्याआधी गुजरात टायटन्सच्या बलाढ्य खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. या खेळाडूने अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच हा स्फोटक फलंदाज आयपीएलपूर्वी निवृत्तीची घोषणा करेल अशी अपेक्षा कोणालाच नव्हती. तर वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी या खेळाडूने निवृत्ती का जाहीर केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याबरोबरच,आयपीएलमधील प्रत्येक संघ काहीना काही अडचणींचा सामना करत असल्याचं दिसत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुखापतीमुळे तगड्या संघानाही फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र आपण आयपीएल खेळत राहणार असल्याचेही या खेळाडूने स्पष्ट केले आहे.
गुजरात टायटन्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मॅथ्यू वेड याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तसेच ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या शेफिल्ड शील्ड या देशांतर्गत स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर तो निवृत्त होणार आहे. तसेच तो आयपीएलमध्ये शेफील्ड शील्ड स्पर्धा खेळल्यानंतर सहभागी होणार आहे. या तो आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.
अशातच मॅथ्यू वेडचा पर्थ येथे होणारा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शेवटचा सामना असणार आहे. तसेच मॅथ्यू वेडने व्हिक्टोरियाकडून खेळताना एकूण 4 विजेतेपद पटकावले आहेत. यापैकी वेड स्वतः दोनदा कर्णधार होता. तर निवृत्त होताना वेडने साथ देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले आहे.
Four-time Shield winner, former Victorian skipper and Australian Test Cricketer No. 428.
Congratulations to Matthew Wade on an outstanding red-ball career for Victoria, Tasmania and Australia 👏 pic.twitter.com/NuwFMbqNVw
— Victorian Cricket Team (@VicStateCricket) March 15, 2024
त्यानंतर त्यांनने सांगितले आहे की मी माझे कुटुंब, माझी पत्नी ज्युलिया आणि मुले हिवाळी यांचे योगदानाबद्दल मी त्याचे आभार मानू इच्छितो आहे. तसेच मॅथ्यू वेड यापुढेही पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळणार आहे. यावरून हे स्पष्ट होते की, खेळाडू जरी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असला तरी तो ऑस्ट्रेलियासाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप खेळणार आहे. याशिवाय तो T20 विश्वचषकातही संघाचा भाग असू शकतो.
🚨Matthew Wade is all set to miss Gujarat Titans' opening game of IPL 2024 after prioritising the Sheffield Shield final.
🚨Tasmania are in pole position to host the final between March 21-25 this year whereas Titans' first game of the season is set to be played on March 24… pic.twitter.com/rDMEW4mmlF
— Cricbuzz (@cricbuzz) March 8, 2024
दरम्यान, आयपीएल 2024 स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी सात ते आठ दिवस बाकी आहेत. तसेच सगळे खेळाडू आपआपल्या टीम मध्ये जमा व्हायला सुरवात देखील झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- IPL 2024 : आयपीएलच्या इतिहासामध्ये आत्तापर्यत ‘या’ संघाच्या नावावर सर्वाधिक षटकार, अन् शेवटी गुजरात टायटन्स
- 147 वर्षांचं झालं कसोटी क्रिकेट! आजच्याच दिवशी खेळला गेला होता इतिहासातील पहिला सामना