आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला 10 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला होता. यासह भारताने 8व्यांदा आशिया चषक विजेतेपद पटकावले. दुसरीकडे, श्रीलका संघ 7व्यांदा चषक उचांवण्यात अपयशी ठरला. अंतिम सामन्यात श्रीलंकेची फलंदाजी पाहून कर्णधार दसून शनाका हा खूपच निराश दिसला. आता श्रीलंका क्रिकेटमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे.
श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार दसून शनाका कर्णधारपदावरून पायउतार (Dasun Shanaka could step down as sri lanka captain) होऊ शकतो, असे वृत्त समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्ड यासंदर्भात एक बैठक घेईल, ज्यात शनाकाला कर्णधारपदावरून काढण्यावर शिक्कामोर्तब केले जाईल.
खरं तर, आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट होते. त्यामुळे नाणेफेक जिंकून दसून शनाका याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. यानंतर चर्चा होऊ लागली की, त्याचे कर्णधारपद धोक्यात आहे. त्यामुळेच आता श्रीलंका क्रिकेट बोर्ड एवढा मोठा निर्णय घेत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, शनाकाच्या जागी कुसल मेंडिस (Kusal Mendis) याच्याकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. श्रीलंका क्रिकेट बोर्ड लवकरच महत्त्वाची बैठक घेणार आहे. यामध्ये शनाकाच्या कर्णधारपदावरून हटण्याची आशा आहे. कुसल मेंडिस पदभार सांभाळण्याचा प्रबळ दावेदार आहे.
https://twitter.com/RexClementine/status/1704328748181692750?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1704328748181692750%7Ctwgr%5E2b09ad96bf490212e10be8cadd725b70da4352db%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.crictoday.com%2Fcricket-hindi%2Fcricket-hindi-news%2Fbefore-the-world-cup-2023-dasun-shanaka-to-be-removed-from-odi-captaincy%2F
शनाकाची कर्णधारपदाची आकडेवारी
कर्णधार म्हणून शनाकाने श्रीलंकेसाठी 37 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 23 विजय, तर 14 पराभव पत्करले आहेत. त्याची विजयी टक्केवारी 60.5 टक्के आहे. त्यामुळे त्याचे नेतृत्व खराब आहे असे म्हणता येणार नाही. त्याने कर्णधार म्हणून संघाला 8 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकून दिली होती. याव्यतिरिक्त त्याने श्रीलंकेला 2022 आशिया चषक विजेता बनवले आणि 2023च्या आशिया चषक अंतिम सामन्यातही पोहोचवले. एवढंच नाही, तर त्याच्या संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेसाठीही क्वालिफाय केले आहे. (before the world cup 2023 dasun shanaka could step down as sri lanka captain read here)
हेही वाचाच-
‘विराटसाठी सचिनचा विक्रम मोडणे खूपच कठीण…’, भारताच्याच माजी क्रिकेटरचे लक्षवेधी भाष्य
World Cupमध्ये सर्वाधिक Catch पकडण्याचा रेकॉर्ड ‘या’ दिग्गजाच्या नावे, विराटसाठी चालून आली सुवर्णसंधी