विनेश फोगटच्या (Vinesh Phogat) रौप्य पदकाच्या अपीलवर आज (13 ऑगस्ट) रोजी सीएएस (CAS) आपला निकाल जाहीर करणार आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण भारत विनेशच्या अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाची वाट पाहत आहे. करोडो देशवासीयांच्या मनात प्रश्न आहे की भारतीय कुस्तीपटूला रौप्य पदक मिळणार की नाही? त्यावर आता विनेशच्या 4 वकिलांपैकी 1 असलेले विदुष्पत सिंघानिया यांनी या विषयावर त्यांचं मत मांडलं आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत विदुष्पत सिंघानिया म्हणाले, “आम्हाला आशा आहे, म्हणूनच आम्ही याचिका दाखल केली आणि खूप मेहनत घेतली. होय, सीएएस ऍड-हॉक पॅनेलकडे 24 तासांची मुदत आहे कारण त्यांनी निर्णयाची वेळ एकापेक्षा जास्त वेळा पुढे ढकलंली आहे समिती या प्रकरणाला गांभीर्याने घेत आहे, जर न्यायाधीश यावर अधिक विचार करत असतील तर ते आमच्यासाठी चांगले आहे.”
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटनं (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी केली होती. विनेशनं प्रथम 4 वेळा विश्वविजेत्या आणि गेल्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या प्रतिस्पर्धीचा पराभव केला आणि नंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत धमाकेदार विजय मिळवला. त्यामुळे विनेशनं अंतिम फेरी गाठली होती. सर्वांना विनेशकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही.
अंतिम फेरीच्या दिवशी विनेश फोगटला 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे अपात्र घोषित करण्यात आले. त्यानंतर विनेशनं सीएएसकडे अपील करून रौप्य पदकाची मागणी केली होती. आता सीएएस आज निर्णय देणार आहे. संपूर्ण देशाला सीएएसकडून रौप्य पदकाची अपेक्षा आहे. विनेशला ते मिळाले तर पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचं सातवं पदक असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रेयस आहे सज्ज, ‘या’ देशांतर्गत स्पर्धेत खेळताना दिसणार
124 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट! 2028 मध्ये भारत जिंकणार सुवर्णपदक?
PAKvsBAN: पाकिस्तानात समोस्यांपेक्षा स्वस्त दरात मिळतायत कसोटीची तिकिटे, सोशल मीडियावर होतंय हसू!