भारतीय संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंनी चांगलीच कंबर कसली असून ते जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. अशात या विश्वचषकात स्टार फलंदाज केएल राहुल दोन भूमिका बजावताना दिसेल. एक म्हणजे फलंदाजीतून त्याला धावांचा पाऊस पाडावा लागेल आणि दुसरा म्हणजे यष्टीमागे शानदार यष्टीरक्षण करावे लागेल. तो फॉर्ममध्ये परतल्याचे आशिया चषक 2023 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वांनी पाहिले आहे. मात्र, यष्टीरक्षणात त्याला अजूनही मेहनतीची गरज आहे. विश्वचषकापूर्वी या विभागात आपले 100 टक्के देण्यासाठी राहुल कसून मेहनत घेताना दिसला. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
स्टार स्पोर्ट्सने केएल राहुल (KL Rahul) याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो यष्टीरक्षणादरम्यान यष्टीच्या पुढे मोठा टायर ठेवून फिरकीपटूंविरुद्ध यष्टीरक्षणाचा सराव करताना दिसला. आता माजी भारतीय फलंदाज संजय बांगर यांनी यामागील उद्देशाचा खुलासा केला.
Gloved up @klrahul sweats it out in a training session, #SanjayBangar lauds this innovation using a 🛞
What unique training methods have you seen?
Tune-in to the #WorldCupOnStar
THU, OCT 5, 12:30 PM onwards | Star Sports Network#Cricket pic.twitter.com/ZxWbjtOR1o— Star Sports (@StarSportsIndia) October 3, 2023
काय म्हणाले बांगर?
बांगर म्हणाले, “राहुलने यष्टीच्या पुढे टायर यासाठी ठेवला आहे, जेणेकरून त्याला समोरून येणारा चेंडू कोणत्या दिशेने जातोय, हे दिसू नये. याचा अर्थ असा की, टायर फलंदाजाचे काम करत आहे. फिरकीपटूंविरुद्ध यष्टीरक्षकाला चपळता आणि पायाची हालचाल करावी लागते. यादरम्यान त्याने लेग साईडमध्ये स्टम्पच्या वर एक बॅटही ठेवली होती.”
याचेही कारण सांगताना बांगर म्हणाले, “ती बॅट यासाठी ठेवली होती, जेणेकरून चेंडू त्याला लागून कोणत्या दिशेला जात आहे, याचा अंदाज राहुलला येईल. याचा सराव करण्यासाठी त्याने असे केले. मात्र, माझ्या मते, त्याने टायर आणखी वर ठेवायला पाहिजे होता. जेणेकरून त्याला समजणार नाही की, चेंडू कुठे जात आहे.”
केएल राहुल याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडणे, कदाचित ही संघ व्यवस्थापनाची पहिली पसंत असेल. दुसरा पर्याय म्हणून इशान किशन उपलब्ध असेल. मात्र, प्राथमिकता राहुलला मिळणे निश्चित आहे. त्यामुळेच राहुल स्पर्धेपूर्वी यष्टीरक्षणातील उणीवा दूर करू इच्छित आहे. (before world cup kl rahul wicket keeping placing tire front of wicket this former cricketer explain the reason behind it)
हेही वाचा-
वर्ल्डकप 2023मध्ये आयसीसीकडून सचिनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, 140 कोटी भारतीयांना वाटेल अभिमान
कर्णधाराच्या दीडशतकानंतरही श्रीलंका पराभूत, अफगाणिस्तानने जिंकला सराव सामना