सध्या पाकिस्तानचा क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पण या दौऱ्यावर आल्याच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानी संघ चर्चेत आला आहे. आता पाकिस्तान संघाचा अजून एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे आतापर्यंत पाकिस्तान संघाच्या 7 सदस्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पण्ण झाले आहे.
न्यूझीलंडच्या दौर्यावर पाकिस्तानचे सगळे मिळून 53 खेळाडू आणि अधिकारी आहेत. मालिका सुरू होण्याअगोदर पाकिस्तानच्या संघाला 14 दिवसांसाठी क्वारंटाइन ठेवण्यात आले. मात्र पाकिस्तानचे खेळाडू उघडपणे नियमाचे उल्लंघन करताना दिसले. त्यामुळे न्यूझीलंड सरकारने हा दौरा रद्द करण्याचा इशारा पाकिस्तान संघाला दिला होता. परंतु पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा न्यूझीलंडच्या या धमकीने नाराज आहे.
शोएब अख्तर आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला, “मी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला सांगू इच्छितो की, पाकिस्तान संघ हा कोणता क्लब संघ नाही. हा पाकिस्तानचा राष्ट्रीय संघ आहे. आम्हाला तुमची गरज नाही. आमचं क्रिकेट समाप्त झाले नाही. तुम्हाला ब्राॅडकास्टिंग राईट्सचे पैसे मिळतील. यासाठी तुम्ही आमचे ऋणी असायला पाहिजे की, आम्ही आशा कठीण वेळी तुमच्या देशाचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही पाकिस्तानबद्दल बोलत आहात. या ग्रहावरील सर्वात महान देश आहे. यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य देणे बंद करा. येथून पुढे काळजी घ्या.”
शोएब अख्तरचा राग अनावर
शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डालासुद्धा सुनावले. त्याने प्रश्न उपस्थित केला की, कोरोनाच्या कठीण काळात संघाला चार्टर्ड विमानाने का नाही पाठवले. तो म्हणाला,” काय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला डोकं नाही. संघाला पहिल्यांदा दुबईत पाठवले, नंतर क्वालालंपूर आणि पुन्हा यानंतर ऑकलंड. पीसीबीला संघाच्या सर्व सदस्यांना चार्टर्ड विमानाने पाठवायला पाहिजे होते.”
पकडले गेले पाकिस्तानी खेळाडू
दोन दिवसांपूर्वी पाकिस्तान संघाला न्यूझीलंडने शेवटचा इशारा दिला होता. न्यूझीलंड सरकारला त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते, ज्या ठिकाणी पाकिस्तानचा संघ थांबला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पाकिस्तानचे खेळाडू कशाप्रकारे कोरोनाच्या नियमांचा चक्काचूर करत आहेत. एकमेकांसोबत बोलत आहेत. याशिवाय खाणे – पिणे शेअर करत आहेत. जेव्हा की सर्व खेळाडूंना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन रहायला सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
समालोचन करताना गिलख्रिस्टकडून भारतीय खेळाडूबाबात मोठी चूक, चाहत्यांच्या रोषानंतर मागितली माफी
“…तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात”, विराटने घेतला भारतीय खेळाडूंचा समाचार
श्रीशांतचे मैदानावर पुनरागमन! ‘या’ टी-२० स्पर्धेत घेणार सहभाग
ट्रेंडिंग लेख –
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला
भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके
आयपीएलमध्ये धावांसाठी वणवण करणारे ३ ऑस्ट्रेलियन भारताविरुद्ध पहिल्या वनडेत ‘सुपरहिट’