इंग्लंड संघाकडून काही दिवसांपूर्वी पदार्पण करणाऱ्या सॅम आणि टॉम करनचा तिसरा भाऊ बेन करनही क्रिकेटमध्ये त्याची ओळख निर्माण करत आहे.
बेनने नुकतेच कौंटी क्रिकेटमधील नॉर्थम्प्टनशायर संघाशी दोन वर्षांसाठी करार केला आहे. त्यामुळे तो नॉर्थम्प्टनशायरकडून 2019च्या मोसमापासून खेळेल. याबद्दल नॉर्थम्प्टनशायरच्या ट्विटर अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे.
🚨 NEW SIGNING | Welcome to the club, Ben.
Full story: https://t.co/3RNalxxy5H pic.twitter.com/hDPQxN9bcp
— Northamptonshire CCC (@NorthantsCCC) August 15, 2018
याबरोबरच बेनच्या सॅम आणि टॉम या दोन भावांनीही त्याला शुभेच्छाचे ट्विट केले आहे. सॅम आणि टॉम हे दोघेही कौंटी क्रिकेटमध्ये सरे संघाकडून खेळतात.
Yes @curranjb_57 🎉🙌🏻 https://t.co/l8SYcz4CdE
— Sam Curran (@CurranSM) August 15, 2018
Well deserved @curranjb_57 🙌🏼🙌🏼🙌🏼 super proud xx https://t.co/QUPSL3N2V9
— Tom Curran (@TC59) August 15, 2018
या तिन्ही भावांमध्ये चांगले बॉन्डींग असल्याचे सोशल मिडियातून नेहेमीच दिसुन आले आहे. टॉमने काही दिवसांपूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले होते की एक दिवस आपण तिघेही एकाच संघातून एकत्र खेळू.
So proud of @bencurran17, what a year he is having! Had a great start to the season, followed up with 160 a couple of weeks ago, absolutely smashing it in the t20’s and currently 116* still going as we speak. Can’t wait for the day all 3 of us play together!!! @CurranSM 🙌🏼
— Tom Curran (@TC59) August 7, 2018
बेन हा मागील आठवड्यात स्टिलबॅक्स विटॅलिटी ब्लास्ट संघाकडून डर्बीशायर आणि डरहॅम संघाकडून खेळला.
तसेच त्याला 2015 ते 2017 दरम्यान एमसीसी यंग क्रिकेटर्सकडून खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्याने एमसीसी यंग क्रिकेटर्सकडून खेळताना सर्वांना प्रभावितही केले होते.
यानंतर तो कौउंटी टूजमध्ये खेळला आणि सहा सामन्यांच्या चॅम्पियनशिप स्पर्धेत 490 धावा करत नॉटिंगहॅमशायर आणि वूस्टरशायर विरुद्ध शतकेही झळकावली.
याबद्दल बेन म्हणाला माझे वडीलही या संघाकडून खेळल्याने या संघाचे प्रतिनिधित्व करताना विषेश आनंद होत आहे.
वडीलही खेळायचे क्रिकेट-
विषेश म्हणजे या तिघा भावांचे वडील केविन करन हेही 14 वर्षे कौंटी क्रिकेट खेळले असुन त्यांनीही ग्लूस्टरशायर आणि नॉर्थम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र 2012 ला जॉगिंग करत असताना त्यांचे हार्ट अॅटॅकने निधन झाले. त्यांचे वय त्यावेळी 53 वर्षे होते.
तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले आहे. केविन करन हे 1983 आणि 1987 च्या विश्वचषकात झिम्बाब्वेकडून खेळले होते. यानंतर ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले.
केविन करन हे अष्टपैलू खेळाडू होते. त्यांच्या प्रमाणेच टॉम, बेन आणि सॅम हे देखील अष्टपैलू खेळाडू आहेत. टॉम हा त्यांचा सर्वात मोठा मुलगा असुन बेन मधला आणि सॅम हा धाकटा मुलगा आहे.
टॉम आणि सॅमची अष्टपैलू शैली केविन करनप्रमाणेच आहे. तर बेन हा डाव्या हाताने फलंदाजी करतो तर उजव्या हाताने गोलंदाजी करतो. टॉम आणि सॅम हे दोघेही उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करतात.
टॉमने इंग्लंडकडून मागील वर्षी जूनमध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर तो इंग्लंडकडून कसोटी आणि वनडे मालिकेतही खेळला. मात्र दुखापतीमुळे त्याला सध्या इंग्लंड संघातून बाहेर बसावे लागले आहे.
त्याचबरोबर सॅमने यावर्षी जूनमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तसेच तो सध्या भारताविरुद्ध कसोटी मालिकेट खेळत आहे. टॉम आणि सॅम या दोघांचे जर्सी क्रमांकही अनुक्रमे 59 आणि 58 असा आहे.
त्याचबरोबर केविन करन यांचे वडीलही क्रिकेटपटू होते. त्यांचे नावही केविन असेच असल्याने त्यांना सिनियर केविन असे म्हणतात. त्यांनी 7 प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–खेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश
–टीम इंडियाने वाहिली अजित वाडेकरांना श्रद्धांजली
–नाहीतर सचिन कधीही सलामीवीर झाला नसता…