ऑस्ट्रेलियामध्ये सध्या क्रिकेटचे वारे वाहत आहे. एकीकडे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा समाप्त झाला असताना दुसरीकडे बिग बॅश लीग क्रिकेट रसिकांचे मनोरंजन करत आहे. बिग बॅश लीगमध्ये चौकार व षटकारांसह उत्तम क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळत आहे. नुकत्याच बाद फेरीतील पार पडलेल्या (२९ जानेवारी ) ऍडीलेड स्ट्राइकर्स व ब्रिस्बेन हिट संघांमधील सामन्यात बेन लॉफलीनने सीमारेषेजवळ अविश्वसनीय झेल पकडला आहे.
ब्रिस्बेनकडून खेळत असलेल्या लॉफलीनने या सामन्यात उत्तम क्षेत्ररक्षणासह कंजूसपणे गोलंदाजी देखील केली. मात्र या सामन्यातील त्याच्या गोलंदाजीपेक्षा त्याने पकडलेल्या झेलचीच जास्त चर्चा रंगली आहे.
या सामन्यात ऍडीलेड संघ प्रथम फलंदाजी करत होता. ऍडीलेडच्या डावातील १८ वे षटक ब्रिस्बेनचा अष्टपैलू मार्नस लॅब्यूशेनने टाकत होता. षटकातील पाचव्या चेंडूवर फलंदाज मायकल नेसारने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू त्याला योग्य रित्या टोलवता आला नाही. चेंडू लाँग ऑनवर उभ्या असलेल्या लॉफलीनपासून दूर पडणार असे वाटत असतानाच त्याने हवेत सुर घेत अविश्वसनीय झेल पकडला. लॉफलीनच्या या झेलचे सर्व क्रिकेट रसिकांकडून कौतुक केले जात आहे.
"You cannot do this, Ben Laughlin!" 🤯pic.twitter.com/bATuO9Tv2J
— ICC (@ICC) January 29, 2021
दरम्यान सामन्याचा विचार केला असता, ब्रिस्बेन हिटने ऍडीलेड स्ट्रायकर्स विरुद्ध शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऍडीलेडला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावत केवळ 130 धावांपर्यंतच मजल मारता आली. ब्रिस्बेनकडून लब्यूशेनने 3 षटकात 13 धावा देत 3 गडी बाद केले. प्रतिउत्तरात ब्रिस्बेनने 131 धावांचे माफक लक्ष 7 चेंडू राखत पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या –
टॉप ४: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान ‘या’ भारतीय युवा खेळाडूंकडे असेल सर्वांचे लक्ष
PAK vs SA : फिरकीच्या जाळ्यात फसला पाहुणा संघ, कराची कसोटीत पाकिस्तानचा दमदार विजय