fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोबर्स, बॉथम, कपिल देव यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाला बेन स्टोक्स

July 11, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

कोरोना महामारीमुळे तब्बल ११७ दिवस बंद असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट ८ जुलैपासून सुरु झाले. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान रोज बाऊल स्टेडियमवर सुरू झालेल्या कसोटी मालिकेमुळे, चाहत्यांना एका मोठ्या काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पहायला मिळत आहे. या ऐतिहासिक मालिकेच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा प्रभारी कर्णधार बेन स्टोक्स याने नवीन विक्रम करत दिग्गजांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळविला.

वेस्टइंडीजच्या अल्झारी जोसेफला बाद करत बेन स्टोक्सने आपला १५० वा कसोटी बळी मिळवला याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये ४,००० धावा व १५० बळी मिळविणाऱ्या मोजक्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. तो असा कारनामा करणारा एकूण सहावा क्रिकेटपटू ठरला आहे.

अशा प्रकारचा विक्रम करणारे पहिले खेळाडू वेस्टइंडीजचे महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स हे होते. सोबर्स यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत ८०३२ धावावा व २३५ बळी मिळविले आहेत. इंग्लंडचे सर इयान बॉथम ५२०० धावा आणि ३८३ बळी घेत अशा प्रकारची‌ कामगिरी करणारे पहिले इंग्लिश खेळाडू ठरले होते.

भारतातर्फे या यादीत १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांचे नाव आहे. कपिल देव यांनी ५२४८ धावा बनवत अष्टपैलू खेळाडूंत सर्वाधिक ४३४ बळी मिळवले आहेत. द. आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस याने १३,२८९ धावा करत २९२ बळी आपल्या नावे केले आहेत. न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल विटोरी याचा सुद्धा या यादीमध्ये समावेश होतो. विटोरीने ४५३१ धावा फटकावत ३६२ बळी आपल्या फिरकीच्या जोरावर घेतले आहेत.

आता, स्टोक्सच्या नावे अवघ्या ६४ कसोटी सामन्यात ४०९९ धावा आहेत आणि १५० बळीही त्याने पूर्ण केल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी –

गांगुली म्हणतो; मला धोनीकडून अशी अपेक्षा नव्हती, त्यादिवशी तो वेगळाच वागला

चाहत्यांनी दादाचा वाढदिवस केला खास अंदाजात साजरा; पाहून व्हाल थक्क

कोरोनाचा फटका बसणार या ३ क्रिकेटरला, कमबॅक राहणार केवळ एक स्वप्न


Previous Post

एकाच कसोटी सामन्यात खणखणीत शतक व दणदणीत ५ विकेट घेणारे ३ भारतीय क्रिकेटर

Next Post

दुखापतीमुळे जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूच्या स्वप्नांवर फेरले पाणी

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

“आरसीबीमध्ये सामील झालेल्या पहिल्या दिवसापासून वाटते की मी माझ्या घरात आहे”, दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया 

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Next Post

दुखापतीमुळे जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूच्या स्वप्नांवर फेरले पाणी

पोलिसांच्या कारवाईपासून जेव्हा स्वतःला वाचवत होता 'हा' क्रिकेटपटू, काही वेळातच झाला मृत्यू

क्रिकेटर ते क्रीडामंत्री असा प्रवास केलेल्या माजी खेळाडूच्या पत्नीला कोरोनाची लागण

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.