---Advertisement---

‘चेन्नईची खेळपट्टी बकवास’, राजस्थानच्या खेळाडूने उघडपणे व्यक्त केली नाराजी

On: रविवार, एप्रिल 25, 2021 1:52 AM
---Advertisement---

कोरोना महामारीमुळे इंडियन प्रीमियर लीगचा १४ वा हंगाम भारतातील विविध शहरांमध्ये मात्र, कोणत्याही संघाला घरगुती मैदानाचा फायदा न होऊ देता त्रयस्थ ठिकाणांवर सुरू आहे. स्पर्धेतील पहिले २० सामने चेन्नई आणि मुंबई येथे खेळले जात आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर १० तर, चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) १० सामने खेळवले जाणार आहेत. परंतु, चेन्नईच्या मैदानावरील खेळपट्टीविषयी अनेक आजी-माजी खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई विरुद्ध पंजाब सामन्यातील खेळपट्टीवर नाराज
आयपीएल २०२१ मधील सतरावा सामना चेपॉक स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ बाद १३१ धावा बनवल्या. याचा पाठलाग करताना पंजाबने मयंक अगरवालचा बळी गमावत १७.४ षटकात हे आव्हान पार केले. मात्र, या सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

स्टोक्सने केली नाराजी व्यक्त
मुंबई आणि पंजाब सामन्यात वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवर ह्या आयपीएलमधून बाहेर पडलेला राजस्थान रॉयल्सचा व इंग्लंडचा प्रमुख अष्टपैलू बेन स्टोक्सने उघडपणे नाराजी व्यक्त केली. स्टोक्सने ट्विट करत लिहिले, ‘मी आशा करतो की आयपीएल पुढे जात असताना ही खेळपट्टी आणखी खराब होणार नाही. कमीत कमी १६०-१७० धावांच्या खेळपट्टीवर १३०-१४० धावा होतात म्हणजे खेळपट्टी बकवास आहे.’

https://twitter.com/benstokes38/status/1385637614938730501

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये समालोचन करणारा ब्रेट ली याने देखील स्टोक्सच्या म्हणण्यामध्ये होकार मिळवला. ली म्हटला, “ही एक चकित करणारी खेळपट्टी आहे. इमानदारीने सांगायचे झाल्यास या खेळपट्टीवर कोणताच फलंदाज जम बसवू शकत नाही. गोलंदाजांसाठी देखील या खेळपट्टीवर काही नव्हते. तिथे जराही चेंडू स्विंग झाला नाही. एकूणच खेळपट्टीचा दर्जा खराब होता. मात्र, आपल्याला केएल राहुल व पंजाबच्या संघाचे कौतुक करावे लागेल.”

या दोघांव्यतिरिक्त भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल यानेदेखील खेळपट्टीवर टीका केली. चेन्नईच्या मैदानावरील अखेरचा सामना रविवारी(२५ एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या दरम्यान होईल.

महत्त्वाच्या बातम्या –

अरेरे! ‘डायमंड डक’ होणारा मॉर्गन आयपीएलमधील तिसरा कर्णधार; यापूर्वी ‘हे’ दोन खेळाडूही या यादीत सामील

व्वा काय टॅलेंट आहे! फलंदाजी येण्याची वाट पाहात बसलेल्या मिलरचा तीन चेंडूबरोबरचा ‘हा’ खेळ पाहून असेच म्हणाल

डायमंड डकवर बाद होणारा मॉर्गन केकेआरचा ७वा खेळाडू, पाहा कोणत्या संघाचे सर्वाधिकवेळा खेळाडू झाले अशा पद्धतीने बाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---