---Advertisement---

भारतात बॅझबॉल चालणार का? स्टोक्सने ‘या’ शब्दांत दिले उत्तर

On: मंगळवार, ऑगस्ट 1, 2023 5:48 PM
---Advertisement---

जगातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेतील अखेरचा सामना सोमवारी (31 जुलै) समाप्त झाला. ओव्हल येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने शानदार पुनरागमन करत, 49 धावांनी विजय साजरा केला. यासह पाच सामन्यांची मालिका 2-2 अशा बरोबरीत सुटली. यानंतर इंग्लंड संघ आता थेट पुढील वर्षी भारतात कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत बॅझबॉल क्रिकेटच दिसणार का असा प्रश्न इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला विचारण्यात आला. त्यावर त्याने आपली प्रतिक्रिया दिली.

या मालिकेत इंग्लंड संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. मागील जवळपास दीड वर्षापासून इंग्लंड खेळत असलेल्या बॅझबॉल क्रिकेटचा अवलंब केला तरी त्यांना पहिले दोन सामने गमवावे लागले होते. तरीदेखील त्यांनी आपली पद्धत न बदलता पुढील तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला. मालिकेतील चौथ्या सामन्याच्या पाचव्या दिवशी खेळणे झाल्याने इंग्लंड विजयापासून वंचित राहिला.

खेळाची हीच पद्धत भारतात देखील वापरणार का असा प्रश्न विचारल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना स्टोक्स म्हणाला,

“आम्ही न्यूझीलंडविरुद्ध अशा प्रकारे आक्रमक क्रिकेट खेळण्याची सुरुवात केली. तिथे आम्ही तीनही सामने जिंकलो. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आम्हाला तसे यश मिळाले नाही. पाकिस्तानविरुद्ध आम्ही यशस्वी ठरलो. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील सर्व सामने आम्हाला जिंकता आले नाहीत. भारताविरुद्ध कसे खेळायचे हे त्यावेळीच ठरवले जाईल.”

इंग्लंड संघ पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. इंग्लंडला 2012 पासून भारतात कसोटी मालिका विजय साकारता आला नाही. यावेळी ते आक्रमक पद्धतीने कसोटी क्रिकेट खेळून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करतील.

(Ben Stokes Answer On India Tour Bazball Cricket)

महत्त्वाच्या बातम्या-
लग्नाच्या 1 महिन्यातच बदललं नशीब; वेगवान गोलंदाजाचे एक वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन
रिंकूचे नशीब फळफळले! 18 दिवसात 2 वेळा मिळाली टीम इंडियात जागा; म्हणाला, ‘दररोज 6 तास…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---