---Advertisement---

लग्नाच्या 1 महिन्यातच बदललं नशीब; वेगवान गोलंदाजाचे एक वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन

Prasidh-Krishna
---Advertisement---

बीसीसीआयने सोमवारी (दि. 31 जुलै) आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दौऱ्यात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाचा आणखी एक वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यानेही दुखापतीतून बरे होत पुनरागमन केले आहे. प्रसिद्ध कृष्णाचे 1 वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. 1 वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या या वेगवान गोलंदाजाने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या टी20 स्पर्धेत शानदार प्रदर्शन करत 4 षटकात 36 धावा खर्चून 4 विकेट्स घेतल्या. त्याने माऊंट जॉय क्रिकेट क्लबकडून खेळताना सर सैय्यद क्रिकेटर्सविरुद्ध अशी गोलंदाजी केली.

प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याने एक महिन्यापूर्वी 8 जून रोजी लग्न केले होते. यानंतर आता त्याचे नशीब बदलले आहे. त्याने जवळपास 1 वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याला पहिल्यांदा टी20 संघात संधी मिळाली आहे. 27 वर्षीय प्रसिद्धने भारताकडून आतापर्यंत 14 वनडे सामने खेळले आहेत. तो शेवटचा ऑगस्ट 2022मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर वनडे सामन्यात उतरला होता. या दौऱ्यानंतर त्याला न्यूझीलंड अ संघाविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय अ संघात निवडले गेले होते. मात्र, स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे त्याला मालिकेचा भाग होता आले नव्हते. शार्दुल ठाकूर हा त्याच्या जागी खेळला होता.

आशिया चषकातही खेळू शकतो प्रसिद्ध
प्रसिद्ध कृष्णा स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे यावर्षीच्या सुरुवातीला कर्नाटकसाठी रणजी ट्रॉफीच्या बादफेरीतील सामन्यांमध्येही खेळला नव्हता. मात्र, आता त्याने पुनरागमन केले आहे. तो मागील काही काळापासून एनसीएमध्ये जसप्रीत बुमराह याच्यासोबत रिहॅब पूर्ण करत होता. यादरम्यान त्याने सराव सामन्यात आणि नेट्समध्येही चांगली गोलंदाजी केली होती. हे पाहता त्याला आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवडले गेले आहे. आयर्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघाला आशिया चषक 2023 स्पर्धेत खेळायचे आहे. अशात प्रसिद्धला या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवडले जाऊ शकते. आयर्लंड दौऱ्यावर खेळताना त्याचा खेळण्याचा सरावही होईल.

विश्वचषकासाठीचे पर्याय वाढले
प्रसिद्ध कृष्णा फिट झाल्यामुळे विश्वचषकासाठीही भारतीय संघाकडे वेगवान गोलंदाजांचा पर्याय वाढला आहे. दुखापतग्रस्त होण्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याच्याकडे मधल्या फळीतील गोलंदाज म्हणून पाहत होते. तो योग्य लाईन आणि लेंथने गोलंदाजी करतो. अशात मधल्या षटकांमध्ये धावा रोखण्यासोबतच विकेट घेण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो.

प्रसिद्धविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 14 वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने 25 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच, त्याचे टी20 पदार्पण अद्याप बाकी आहे. अशात आयर्लंड दौऱ्यावर तो या क्रिकेट प्रकारात पदार्पण करू शकतो.

आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग. (this cricketer luck changed after marriage made comeback after 1 year in team india for ireland t20i series read)

महत्त्वाच्या बातम्या-
रिंकूचे नशीब फळफळले! 18 दिवसात 2 वेळा मिळाली टीम इंडियात जागा; म्हणाला, ‘दररोज 6 तास…’
कपिल पाजींच्या ‘अहंकार’ विधानावर जडेजाचे प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माजी खेळाडूंना पूर्ण…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---