ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये सध्या ऍशेस मालिकेचा थरार सुरू आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंड संघावर ९ गडी राखून विजय मिळवला होता. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे १६ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघ जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. इंग्लंड संघातील खेळाडू या सामन्यापूर्वी कसून सराव करत आहेत. दरम्यान सराव करत असताना संघातील दिग्गज खेळाडू थोडक्यात बचावला आहे.
मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. गुलाबी रंगाच्या चेंडूने होणाऱ्या या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जो रूट दुखापतग्रस्त होता होता थोडक्यात बचावला आहे. ज्यामुळे इंग्लंड संघाला मोठा धक्का बसू शकला असता.
तर झाले असे की, एडीलेड कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी कर्णधार जो रूट आणि बेन स्टोक्स नेट्समध्ये सराव करत होते. त्यावेळी बेन स्टोक्सने वेगवान शॉर्ट पीच चेंडू टाकला, ज्यावर जो रूटने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू वेगवान असल्याने जो रूटला अंदाज आला नाही.
गतीचा अंदाज चुकल्यामुळे चेंडू जो रुटच्या हेल्मेटला जाऊन लागला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले कॅमेरामन आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य चिंतित झाले होते. परंतु, काही वेळातच तो ठीक होऊन फलंदाजीसाठी पुन्हा आला. हे पाहून सपोर्ट स्टाफमधील सदस्यांच्या जीवात जीव आला. जर जो रूट कसोटी मालिकेतून बाहेर झाला असता, तर इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला असता.
Ben Stokes hits Joe Root on the head in the Adelaide nets. Box office, always. pic.twitter.com/MBbac4RSsR
— Will Macpherson (@willis_macp) December 14, 2021
ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यातील पहिल्या डावात त्याला खाते ही खोलता आले नव्हते, तर दुसऱ्या डावात पुनरागमन करत त्याने ८९ धावांची खेळी केली होती. जो रूट बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
अरे बापरे! फलंदाजाने इतका जोरदार षटकार मारला की, प्रेक्षकाचे फुटले डोके, पाहा व्हिडिओ
विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार घेणार की नाही? बीसीसीआय अधिकाऱ्याचा खुलासा
पाकिस्तानला मिळाला नवा यॉर्कर किंग? पाहा कशी उडवलीये फलंदाजांची भंबेरी