2024च्या आयपीएल हंगामात अनेक मोठे खेळाडू खेळताना दिसले नव्हते. आता आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. या मेगा लिलावानंतर अनेक मोठ्या खेळाडूंचे संघ बदलणार आहेत. मात्र, अनेक मोठे खेळाडू आयपीएल 2025 मध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या बातमीद्वारे आपण अशा 3 खेळाडूंची नावे पाहू जे 2025च्या आयपीएल हंगामात पुनरागमन करु शकतात.
बेन स्टोक्स (Ben Stokes)- इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) आयपीएल 2023च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. मात्र, स्टोक्स आयपीएल 2024 मध्ये दिसला नाही. सध्या स्टोक्स इंग्लंडमध्ये द हंड्रेड स्पर्धा खेळत आहे. याशिवाय तो दक्षिण आफ्रिकेच्या टी20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. मात्र, आयपीएल 2025 मध्ये बेन स्टोक्स (Ben Stokes) मैदानावर दिसू शकतो, असे मानले जात आहे. मात्र, त्यापूर्वी मेगा लिलाव होणे आवश्यक आहे.
सरफराझ खान (Sarfaraz Khan)- 2015च्या आयपीएल हंगामात सरफराज खान (Sarfraz Khan) पहिल्यांदाच खेळला होता. त्या हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा भाग होता. सरफराझ आयपीएल 2024च्या लिलावात विकला गेला नाही. कोणत्याही संघानं या युवा फलंदाजाला घेण्यासाठी इच्छा दर्शवली नाही. मात्र, कोलकाता नाईट रायडर्स सरफराजला संघात घेईल, असे मानले जात होते, मात्र तसे झाले नाही. सरफराज 2025च्या आयपीएल हंगामात दिसू शकतो.
डेव्हाॅन काॅनवे (Devon Conway)- कॉनवे चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. सलामीवीर म्हणून त्यानं सीएकसकेसाठी धावा केल्या. पण दुखापतीमुळे तो आयपीएल 2024 मध्ये खेळू शकला नाही. सध्या असे म्हटले जाते की, सीएसकेनं आयपीएल 2024च्या हंगामात कॉनवेला मिस केलं, जर तो असता तर टॉप ऑर्डर अधिक मजबूत दिसली असती. कॉनवे आयपीएल 2025 मध्ये पुनरागमन करू शकतो. चेन्नई कॉनवेला संघात कायम ठेवतं की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. जर हा खेळाडू कायम ठेवला नाही तर तो लिलावात दिसू शकतो.
2025च्या आयपीएल हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. पण बीसीसीआयनं त्याची तारीख अद्याप स्पष्ट केली नाही आणि लिलावामध्ये एक संघ किती खेळाडू रिटेन करु शकतो हे देखील अद्याप स्पष्ट झालं नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
उपांत्यपूर्व सामना 1-1 ने बरोबरीत राहूनही पराभूत झाली रितिका! काय आहे नियम?
नीरज चोप्राला आपल्या आवडीच्या मुलीशी करायचं आहे लग्न? आईचा मोठा खुलासा
इंग्लंडच्या दिग्गजानं निवडले जगातील टाॅप-5 फलंदाज, पाचव्या क्रमांकावर ‘या’ खेळाडूला स्थान