---Advertisement---

Video: अरेरे, भावा चेंडू तरी नीट पकडायचा! बेन स्टोक्सने ‘असा’ सोडला इशानचा सोपा झेल

---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान अहमदाबाद येथे रविवारी (१४ मार्च) टी२० मालिकेतील दुसरा सामना झाला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी गोलंदाजी, क्षेत्ररक्षणाबरोबर फलंदाजीतही शानदार प्रदर्शन केले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारताला विजयासाठी १६५ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पदार्पणवीर इशान किशन याने धुव्वादार अर्धशतकी खेळी केली. दरम्यान बेन स्टोक्स याच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे इशानला जीवनदान मिळाले.

त्याचे झाले असे की, सलामीवीर केएल राहुल स्वस्तात बाद झाल्यानंतर इशान आणि कर्णधार विराट कोहली डावास चालना देत होते. त्यांनी मैदानाच्या चारही बाजूंना जबरदस्त फटके मारत सातव्या षटकापर्यंत अर्धशतकी भागिदारी रचली. पुढे फिरकीपटू आदिल राशिदच्या षटकात (७.३ षटक) इशानने खणखणीत चौकार मारला.

त्यापुढील चेंडूवरही उत्तुंग षटकार किंवा चौकार वसूल करण्याच्या प्रयत्नात इशानने लाँग ऑनवर जोरदार शॉट मारला. परंतु चेंडू हवेत जास्त उंचीवर गेल्याने सीमारेषेच्या आतच राहिला. यावेळी लाँग ऑनवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या स्टोक्सला सहजरित्या चेंडू झेलण्याची संधी होती. स्टोक्सनेही दोन्ही हातांनी चेंडू पडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हातून चेंडू निसटला आणि इशानला जीवनदान मिळाले.

https://twitter.com/RealImranKhan01/status/1371134771166871554?s=20

https://twitter.com/The_commonman_/status/1371135311288299525?s=20

https://twitter.com/ArfatHu28316950/status/1371141885444595717?s=20

त्यानंतर इशानने आक्रमक खेळी करत दहाव्या षटकापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. अखेर त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर फिरकी गोलंदाज रशिदने त्याला पायचित केले. यासह ३२ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने इशानने ५६ धावा चोपल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsENG 2nd T20 Live : पदार्पणाच्या सामन्यात इशान किशन चमकला; मात्र अर्धशतक करुन बाद, भारताच्या १० षटकात ९४ धावा

इशान किशन, सुर्यकुमारच्या पदार्पणामुळे झाला खास विक्रम; ‘अशी’ कामगिरी करणारी पहिलीच भारतीय जोडी

रिषभ पंत रिव्ह्यू सिस्टीम ऍक्टिवेट! अचूक निर्णय घेत डेविड मलानचा अडथळा केला दूर, बघा व्हिडिओ    

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---