ब्रिस्टल | गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये इंग्लंड आणि विंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने दारुच्या नशेत दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली होती.
या प्रकरणाची सोमवारी (५ ऑगस्ट) ब्रिस्टल न्यायालयात सुनावनी झाली आहे.
यावेळी न्यायालयात सुनावनी दरम्यान पब बाहेर हे प्रकरण घडले तेव्हा प्रत्यक्षदर्षी असलेल्या एका विद्यार्थ्यांने, बेन स्टोक्स दोन व्यक्तींना मारहाण करताना पहिले असल्याचे सांगितले. तसेच स्टोक्स मारहण करतानाचा व्हिडिओ या विद्यार्थ्याने चित्रित केला आहे अशी माहिती न्यायालयाला दिली.
ज्यावेळी हे प्रकरण घडले त्यावेळी इंग्लडचा यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स हेल्स देखील उपस्थीत होता.
यावेळी हेल्सने स्टोक्स मारहाण करताना त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होता, असेही प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांने सांगितले.
सोमवारी झालेल्या सुनावनीनंतर न्यायलय याप्रकरणी तिसऱ्या कसोटी सामन्या दरम्यानची पुढील तारीख देण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भारत इंग्लंड यांच्यात १८ ते २२ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील स्टोक्सच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-तरुण, प्रतिभावान खेळाडूंबद्दल मास्टर ब्लास्टर सचिनचे मोठे भाष्य
-२० वर्षीय फलंदाजाचा अविश्वसनीय प्रवास, लॉर्ड्स कसोटी सामन्यात करणार पदार्पण!