भारत विरुद्ध इंग्लंड संघात १३ फेब्रुवारीपासून दुसरा कसोटी सामना चालू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडपुढे ३३० धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात इंग्लंडला संघ १३४ धावांवरच गारद झाला. यादरम्यान इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज बेन स्टोक्स स्वस्तात बाद झाला. त्यानंतर स्टोक्सचे आक्रमक रूप पाहायला मिळाले.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये बेन स्टोक्स जेव्हा फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. परंतु अश्विनने त्याला आपल्या २० धावाही करू दिल्या नाहीत. त्याने डावातील २३.२ षटकात स्टोक्सला त्रिफळाचीत करत तंबूचा रस्ता दाखविला. त्यामुळे बाद झाल्यावर ड्रेसिंग रूमकडे जात असताना तेव्हा तो खूपच रागात असल्याचे दिसून आले. त्याने क्रोधाच्या भरात आपले हेल्मेट जमिनीवर आदळून पायाने हेल्मेटला लाथ देखील मारली.
स्टोक्सचे हे सगळे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर पाहताक्षणीच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याच्या या कृत्याचा सोशल मिडियावर काही जण निषेध करत आहेत.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील कामगिरी
इंग्लंडच्या पहिल्या डावात स्टोक्सला खास कामगिरी करता आली नाही. ३४ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने त्याने फक्त १८ धावा केल्या. दुसरीकडे इंग्लंडचा यष्टीरक्षक बेन फोक्सने सर्वाधिक ४२ धावा तर ओली पोपने २२ धावा काढल्या होत्या. डॉम सीबली याने १६ धावांचे योगदान दिले होते. इतर फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही.
गोलंदाजी करताना भारताकडून अश्विनने ४३ धावा देत ५ विकेट्स काढल्या होत्या. तर इशांत शर्मा आणि अक्षर पटेल यांच्या खात्यात प्रत्येकी २-२ विकेट्स होत्या. सिराजने देखील एक विकेट घेत चांगली कामगिरी बजावली होती.
https://twitter.com/jamlishsays/status/1360860552273272832?s=20
@ICC @englandcricket @BCCI This is shameful by Ben stokes. This gentlemans game why he kick the helmet where the England logo are there. Kindly respect your country's. pic.twitter.com/CVXWo7k1dC
— Gs (@gs_hhh) February 14, 2021
बेन स्टोक्सची क्रिकेट कारकिर्द
बेन स्टोक्सने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण ६९ कसोटी सामने खेळले असून १५९ विकेट्स तर ४५३५ धावा त्याच्या नावावर आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९५ सामने खेळले असून ७० विकेट्ससह २६८२ धावा त्याच्या खात्यात आहेत. याशिवाय टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९ सामन्यात ३५८ धावा आणि १६ विकेट्स हस्तगत करण्यास तो यशस्वी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
भावा जिंकलंस रे जिंकलंस..! शतक झालं अश्विनचं पण सेलिब्रेशन केलं सिराजने
देव, धोनी, भज्जी… यांच्याही अगोदर आता अश्विनला ‘आठवा’, पठ्ठ्याने विक्रमच केलाय तसा