जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाला सुरुवात होण्यासाठी पाच दिवसांचा वेळ शिल्लक राहिला आहे. या आयपीएल हंगामासाठी आता विदेशी खेळाडूंचे भारतात आगमन होण्यास सुरुवात झालीये. त्याचवेळी चार वेळा विजेतेपद जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्सचे अष्टपैलू बेन स्टोक्स व मोईन अली हे भारतात दाखल झाले. चेन्नईत उतरल्यानंतर स्टोक्स याने अवघ्या काही तासातच सराव सत्रामध्ये भाग घेतला. यावेळी तो आक्रमक फटकेबाजी करताना दिसला.
https://www.instagram.com/reel/CqLKHgGtYEa/?igshid=YmMyMTA2M2Y=
मागील वर्षी आयपीएल मध्ये सहभागी न झालेला स्टॉक यावेळी आयपीएल लिलावात उतरला होता. जगातील नामवंत अष्टपैलूंमध्ये गणना होणाऱ्या स्टोक्सला चांगलीच मागणी होती. अखेर चेन्नई सुपर किंग्सने 16.25 कोटींची सर्वाधिक बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. विशेष म्हणजे यावेळी स्टोक्स संपूर्ण आयपीएलसाठी उपलब्ध राहणार आहे.
शुक्रवारी (24 मार्च) त्याचे भारतात आगमन झाले. दुपारी चेन्नईत उतरल्यानंतर तो सायंकाळच्या सराव सत्रात फटकेबाजी करताना दिसला. चेन्नई सुपर किंग्सने तो फलंदाजी करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तो समोरच्या दिशेने षटकार ठोकताना दिसून येतोय.
आयपीएल 2023 साठी चेन्नई सुपर किंग्स संघ-
एमएस धोनी ( कर्णधार), रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगारगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, माथेर सिंग, प्रशांत सिंघल, प्रशांत पाटील. , महेश थिक्षना, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जेमिसन, अजय मंडल, भगत वर्मा, सिसांडा मगला.
(Ben Stokes Hitting Sixes In CSK First Training Session)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेंडू स्टंपला लागूनही कीवी फलंदाज नाबाद, खेळाडूही पाहतच राहिले; जीवदान मिळताच पठ्ठ्याने ठोकली फिफ्टी
“यंदा आयपीएलमध्ये होणार पृथ्वी शो!” नव्या हंगामाआधी पॉंटिंगने केले भाकीत