ऑस्ट्रेलियात आयोजित केल्या गेलेल्या आठव्या टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (13 नोव्हेंबर) खेळला गेला. मेलबर्न येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत करत विश्वचषक आपल्या नावे केला. या अंतिम सामन्यात इंग्लंडसाठी पुन्हा एकदा अनुभवी अष्टपैलू बेन स्टोक्सने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. अखेरपर्यंत नाबाद राहत त्याने एक वेळ अवघड झालेल्या या सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून दिला. सहा वर्षांपूर्वी याच टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तो इंग्लंडसाठी खलनायक ठरलेला. मात्र, हातात त्यानेच इंग्लंडला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
कोलकाता येथे 2016 टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान खेळला गेला होता. या सामन्यात इंग्लंड अखेरच्या षटकापर्यंत आघाडीवर होता. अखेरच्या षटकात वेस्ट इंडीजला विजयासाठी 19 धावांची गरज होती. तेव्हा इंग्लंडकडून अखेरचे षटक स्टोक्सने टाकले. कार्लोस ब्रेथवेटने पहिल्या चार चेंडूवर चार षटकार ठोकत वेस्ट इंडीजला विजेते बनवले. त्यावेळी स्टोक्सवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
या वाईट काळातून पुढे येत स्टोक्सने स्वतःला सावरले. तीन वर्षानंतर मायदेशात झालेल्या वनडे विश्वचषकात त्याने अंतिम फेरीत संघासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. आधी नाबाद अर्धशतक करत त्याने सामना टाय केला. त्यानंतर सुपर ओवर मध्ये पुन्हा एकदा फलंदाजीला येत निर्णय धावा करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याचवर्षी ऍशेस मालिकेत ओव्हलवर त्याने ठोकलेले शतक आजही क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळ्यांपैकी एक मानले जाते.
आता सहा वर्षांपूर्वी इंग्लंडचे अधुरे राहिलेले टी20 विश्वचषक विजयाचे स्वप्न पूर्ण करताना त्याने नाबाद अर्धशतक ठोकले. त्यामुळे आधुनिक क्रिकेटमधील इंग्लंडचा सर्वोत्तम क्रिकेटपटू असे त्याला म्हटले जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकाचा संघ कसा जाहीर करावा हे उरुग्वेकडून शिका, व्हिडिओ व्हायरल
नेपाळही भूषवणार अंडर 19 विश्वचषकाचे यजमानपद! या देशात ‘यंग इंडिया’ राखणार आपले विश्वविजेतेपद