---Advertisement---

नेपाळही भूषवणार अंडर 19 विश्वचषकाचे यजमानपद! या देशात ‘यंग इंडिया’ राखणार आपले विश्वविजेतेपद

On: रविवार, नोव्हेंबर 13, 2022 1:24 PM
India-England-U19-Captain
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात संपन्न झालेल्या टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढील आणखी विश्वचषकांबाबत नुकतीच घोषणा केली आहे. आयसीसीने भविष्यात होणाऱ्या मुलांच्या अंडर नाईन्टीन क्रिकेट विश्वचषक तसेच महिला अंडर नाईन्टीन विश्वचषकाच्या यजमानांची नावे नुकतीच जाहीर केली. विशेष म्हणजे यापैकी तीन स्पर्धा या आशियात होणार आहेत.

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला भविष्यातील सितारे देणाऱ्या अंडर 19 विश्वचषकाचे अखेरच्या वेळी आयोजन यावर्षी वेस्ट इंडीजमध्ये करण्यात आले होते. भारतीय संघाने या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावलेले. त्यानंतर आता 2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंका भूषवेल. तब्बल 24 वर्षानंतर श्रीलंकेला हा मान मिळणार आहे.‌ श्रीलंकेने अखेरच्या वेळी 2000 मध्ये या स्पर्धेचे यजमानपद मिळवलेले.‌ त्यानंतर 2026 च्या अंडर 19 विश्वचषकाचे आयोजन झिम्बाब्वे व नामिबिया करतील.‌ हे दोन्ही संघ प्रथमच कोणत्याही विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.

आयसीसीने या यजमानपदांची घोषणा करताना म्हटले,

“विश्वचषक आयोजकांची निवड ही पारदर्शकपणे बोली प्रक्रियेतून करण्यात आली आहे. आयसीसीच्या उप समितीचे मार्टिन स्नेडन यांच्या अध्यक्षतेखाली हे निर्णय घेतले गेले. त्यानंतर आयसीसीच्या व्यवस्थापन समितीने याबाबत पूर्ण चौकशी व परिस्थिती पाहून या देशांना यजमानपद देण्याचा निर्णय घेतला आहे.”

पुढील वर्षी प्रथमच आयोजित होत असलेल्या महिला अंडर 19 विश्वचषकानंतर 2025 मध्ये आशियाई देश थायलंड व मलेशिया या स्पर्धेचे आयोजन करतील. त्यानंतर ‌‌‌2027 मध्ये भारताचे शेजारी असलेले बांगलादेश व नेपाळ हे या स्पर्धेचे यजमान असतील. त्याचवेळी 2027 मध्ये होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषकाच्या पात्रते फेरीविषयी देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. या स्पर्धेचे यजमान असलेल्या दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे या दोन देशांना विश्वचषकात थेट प्रवेश मिळेल. तर, कट ऑफ वेळेपर्यंत क्रमवारीत अव्वल आठ स्थानावर असलेले संघ विश्वचषकासाठी पात्र होतील.

(Srilanka Host U19 Cricket World Cup 2024)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20मध्ये बाबर आझम इंग्लंडचा कर्दनकाळ! आकडे पाहून विरोधी संघाला धक्का बसेल
T20WC: फायनलमध्ये टीम इंडिया नाही पण इंडियन तडका! एमसीजीमध्ये 13 वर्षीय भारतीय मुलीचा जलवा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---