इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने पुन्हा एकदा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेण्याची ईच्छा व्यक्त केला आहे. मात्र, एका व्यक्तीच्या सांगण्यावरूनच तो परत येऊ शकतो. अशी अट त्याने घातली आहे. मंगळवारी बेन स्टोक्सने संकेत दिले की तो इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघात पुनरागमन करण्यास तयार आहे. गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर स्टोक्सने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दुखापतीमुळे तो 2024 च्या टी20 विश्वचषकात खेळला नव्हता. पण आता त्याने आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
विश्वचषक विजेता (2019) आणि टी-20 विश्वचषक (2022) विजेत्या इंग्लंड संघासाठी फायनलमध्ये चांगली कामगिरी करणारा बेन स्टोक्स अजूनही तंदुरुस्त नाही. परंतु त्याने म्हटले आहे की जर संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमला त्याने पुनरागमन करावे असे वाटत असेल तर तो तंदुरुस्त होईल. यासाठी तो तयार असेल. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान स्काय स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत बेन स्टोक्स म्हणाला, “पांढऱ्या चेंडूचा हा संघ एका नवीन दिशेने गेला आहे. आम्ही पाहिले आहे काही अविश्वसनीय प्रतिभा उदयास आली. त्यापैकी एक म्हणजे: जेकब बेथेल, जो माझ्या मते पुढील सुपरस्टार होणार आहे.”
स्टोक्स पुढे म्हणाला, “मी इंग्लंडसाठी खूप मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळलो आहे. खेळाच्या या फॉरमॅटमध्ये मी जे काही साध्य केले त्याबद्दल मी खूप आनंदी आणि समाधानी आहे.” स्टोक्स पुढे म्हणाला की, त्याला संघात समाविष्ट करण्याची योजना आखली गेली तर ती चांगली गोष्ट आहे. “जर मला (ब्रेंडन मॅक्युलमचा) कॉल आला आणि ‘खेळायचे आहे का?’ असे विचारले गेले तर त्याचे उत्तर नक्कीच ‘हो’ असेल. पण तसे झाले नाही तर मी फार निराश होणार नाही, “कारण याचा अर्थ कोणीतरी संघात आला आहे. तो खरोखर चांगले काम करत आहे.”
हेही वाचा-
मायदेशी पोहचताच शाकिब अल हसनला अटक होणार? बीसीबीने दिला मोठा अपडेट
Ind vs Ban: कानपूर कसोटीत पावसाचा खेळ? हवामान अंदाजाने चाहत्यांची चिंता वाढली
ENG VS AUS; इंग्लंडचा पलटवार, आखेर ऑस्ट्रेलियाच्या विजयी रथला ब्रेक!