इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स दुखापतीमुळे विश्वचषकातील पहिला सामना खेळला नव्हता. 5 ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सर्व संघांनी आपला पहिला सामना खेळला आहे. इंग्लंडला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 9 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. आपला दुसरा सामना इंग्लंडला 10 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंड संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.
इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याने वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मागच्या वर्षी त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण संघ व्यवस्थापन आणि सहकारी खेळाडूंमुळे त्याने विश्वचषक खेळण्याचा निर्णय गेतला. असे असले तरी, बेन स्टोक्स विश्वचषकातील पहिल्या सामन्यापाठोपाठ दुसऱ्या सामन्यातून देखील माघार घेऊ शकतो. माध्यमांतील वृत्तांनुसार अष्टपैलू खेळाडूने अद्याप 100 टक्के फिटनेस मिळवली नाहीये. असात मंगळवारी (10 ऑक्टोबर) त्याला बांगालदेशविरुद्धच्या सामन्यात देखील तो माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इंग्लंडच्या विश्वचषक संघाचा कर्णधार जोस बटलर याने स्टोक्सच्या फिटनेसविषयी माहिती दिली. बटलरच्या माहितीनुसार स्टोक्सच्या फिटनेसमध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. बटलर म्हणाला, “चांगली सुधारणा दिसत आहे. दिवसेंदिवस त्याच्यातील प्रगती पाहायला मिळत आहे, जे चांगले संकेत आहेत. त्याला नेट्समध्ये पुन्हा पाहणे हे चांगले आहे. पण उद्याच्या सामन्यातो खेळण्याची शक्यता नाहीये.”
Ben Stokes is likely to miss the Bangladesh match in the World Cup. [Espn Cricinfo] pic.twitter.com/4OzAGLmDB0
— Johns. (@CricCrazyJohns) October 9, 2023
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात स्टोक्स खेळला नाही, तरी त्यानंतर अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यासाठी तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल, अशी पूर्ण शक्यता आहे. विश्वचषकातील आपल्या दुसऱ्या सामन्याआधी स्टोक्स खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांविरुद्ध सराव करताना दिसला. मंगळवारी (10 ऑक्टोबर) बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यातील सामना धरमशाला स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर इंग्लंडला आपला तिसरा सामना रविवारी (15 सप्टेंबर) अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. (Ben Stokes is likely to miss match against Bangladesh in World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
आले किती गेले किती, पण वनडेतील ‘चेज मास्टर’ विराटच; सरासरी पाहून तोंडात घालाल बोटे
जिथं सचिन, तिथं विराट! वनडेत आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना ‘एवढ्या’ वेळा ठोकल्या 50 हून अधिक धावा