मुंबई । ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यात स्टोक्सने पहिल्या डावात 176 तर दुसऱ्या डावात नाबाद 78 धावा केल्या होत्या. तसेच तीन बळी देखील घेतले. तो इंग्लंडच्या विजयाचा नायक होता. पण यावेळी त्याच्या पायाचे स्नायू दुखावले गेले आणि तो अद्याप त्यातून पूर्णपणे सावरलेला नाही.
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने असे संकेत दिले आहेत की, स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स वेस्ट इंडिजविरुद्ध पूर्णपणे फिट नसेल तर शुक्रवारपासून सुरू होणार्या तिसर्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात पुर्णवेळ फलंदाज म्हणून खेळू शकेल.
रूट म्हणाला, ”बेनला अद्याप कोणत्या अडचणी आहेत हे आम्हाला पाहावे लागेल. कारण अजूनही त्याला काही समस्या आहेत आणि तो गोलंदाजीसाठी तंदुरुस्त आहे याची आम्हाला खात्री करून घ्यावी लागेल. दुसर्या सामन्यात शानदार कामगिरी करून स्टोक्स आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत तिसर्या स्थानावर आला. त्याला 14 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले असून गरज असल्यास नंतर गोलंदाजी करू शकेल.”
रूट म्हणाला, “त्याला फलंदाज म्हणून संघात घेतल्यास ते निश्चितच योग्य ठरेल. या सामन्यात इंग्लंड चार वेगवान गोलंदाजांना उतरविण्याबाबत विचार करू शकेल. अशा परिस्थितीत बेसला बाहेर बसावे लागेल आणि मला फिरकीपटूची भूमिका पार पाडावी लागेल. आमच्याकडे बरेच चांगले पर्याय आहेत. आम्ही ज्या गोलंदाजीच्या आक्रमणासह मैदानात उतरु, त्यांच्याकडे 20 विकेट घेण्यास नक्कीच सक्षम असेल.”
साऊथॅम्प्टन येथील पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिजने चार विकेट्सने जिंकला. परंतु इंग्लंडने दुसरा सामना ओल्ड ट्रॅफर्ड 113 धावांनी जिंकला. आणि तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरी साधली. वेस्ट इंडीजला विस्डेन करंडक टिकवायचा असेल तर त्यांना किमान तिसरा सामना ड्रॉ करावा लागेल. हा सामना जिंकला तर जेसन होल्डरचा संघ 1988 नंतर इंग्लंडच्या भूमीवर मालिका जिंकणारा पहिला कॅरेबियन संघ बनेल.
इंग्लंड-वेस्ट इंडीज मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांस पावसाचा फटका बसला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार तिसर्या सामन्यालाही खराब हवामानाचा फटका बसू शकतो. दुसर्या कसोटी सामन्यात तिसर्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. असे असूनही जर इंग्लंड जिंकण्यात यशस्वी ठरला तर स्टोक्स आणि गोलंदाजांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तिसर्या कसोटी सामन्यात काय होते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वाचा- १९९०मध्ये या देशाच्या क्रिकेटरंना क्वारंटाईन केलं असतं तर फोडली असती एकमेकांची डोकी