ब्रिस्टल | गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये इंग्लंड आणि विंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिके दरम्यान इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने दारुच्या नशेत दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली होती.
या प्रकरणाची सोमवारी (५ ऑगस्ट) ब्रिस्टल न्यायालयात सुनावनी झाली आहे.
५ ऑगस्टच्या सुनावणीसाठी आधीच भारता विरुद्धच्या ९ ऑगस्ट रोजी दुसऱ्या कसोटीला मुकलेला बेन स्टोक्स तिसऱ्या कसोटी सामन्यालाही मुकण्याची शक्यता आहे.
सोमवारी झालेल्या सुनावनीनंतर न्यायलय याप्रकरणी तिसऱ्या कसोटी सामन्या दरम्यानची पुढील तारीख देण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भारत इंग्लंड यांच्यात १८ ते २२ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील स्टोक्सच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
एजबस्टन मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या विजयात बेन स्टोक्सने मोलाची भूमीका निभावली होती.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-फलंदाजाचे शतक होऊ नये म्हणुन क्रिकेटमध्ये घडला हा घाणेरडा प्रकार
-स्टार्क म्हणतो, विराट थोडा थांब, तुझे अव्वल स्थान हा खेळाडू घेईल