---Advertisement---

ज्या न्यूझीलंडला स्टोक्समुळे पराभवाचा सामना करावा लागला त्यालाच मिळणार मोठा पुरस्कार

On: शुक्रवार, जुलै 19, 2019 4:50 PM
---Advertisement---

रविवारी(14 जूलै) 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद इंग्लंडला मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या बेन स्टोक्सला ‘न्यूझीलंडर्स ऑफ द ईयर’ पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. त्याच्याबरोबरच न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विलियम्सनलाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी पार पडलेल्या विश्वचषकातील नाट्यपूर्ण अंतिम सामन्यात सुपर ओव्हरही बरोबरी सुटल्यानंतर बाऊंड्रीच्या फरकांमुळे इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले होते.

या सामन्यात 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची आवस्था 23.1 षटकात 86 धावात 4 विकेट अशी असताना स्टोक्सने 98 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या होत्या. तसेच जॉस बटलरबरोबर 110 धावांची पाचव्या विकेटसाठी भागीदारी केली होती.

त्याचबरोबर त्याने सुपर ओव्हरमध्येही बटलर बरोबर फलंदाजी करताना 8 धावाही केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.

पण स्टोक्स इंग्लंडकडून खेळला असला तरी त्याचा जन्म 4 जून 1991 ला न्यूझीलंडमध्येच झाला आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील 11 वर्षे ख्राईस्टचर्च येथे व्यतित केली आहेत.

पण त्यानंतर स्टोक्स 12 वर्षांचा असताना त्याचे वडील गेरार्ड यांचा वर्किंग्‍टन टाउन रग्बी लीग क्लबसाठी रग्बी प्रशिक्षक म्हणून करार झाला. त्यावेळी स्टोक्स कुटुंबाबरोबर इंग्लंडला वास्तव्यास आला.

स्टोक्सने इंग्लंडमध्येच त्याच्या क्रिकेटला सुरुवात केली आणि तो इंग्लंडमध्येच स्थायिक झाला. पण 2013 नंतर त्याचे आई-वडील पुन्हा ख्राईस्टचर्चला येऊन स्थायिक झाले. तर स्टोक्स इंग्लंडमध्येच थांबला.

स्टोक्स बरोबरच ‘न्यूझीलंडर्स ऑफ द ईयर’ पुरस्कारासाठी नामांकन मिळलेल्या विलियम्सनला या विश्वचषकाचा मालिकावीर पुरस्कार देण्यात आला होता. त्याने या विश्वचषकात 10 सामन्यात 82.57 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. तसेच त्याने या सामन्यानंतर ज्या संयमाने न्यूझीलंडचा पराभव स्विकारला त्याचे सर्वांनी कौतुक केले आहे. 

‘न्यूझीलंडर्स ऑफ द ईयर’ पुरस्काराचे मुख्य न्यायाधीश कॅमेरॉन बेनेट याबद्दल म्हणाले, ‘स्टोक्स जरी न्यूझीलंडसाठी खेळत नसला तरी त्याचा जन्म ख्राईस्टचर्चला झाला आहे, जिथे सध्या त्याचे पालक राहत आहेत. तिथे काही किवी आहेत, जे अजूनही तो आपला असल्याचा दावा करु शकतात.’

त्याचबरोबर विलियम्सनबद्दल बेनेट म्हणाले, ‘विलियम्सनने विश्वचषकात न्यूझीलंडच्या धैर्याचे, निष्पक्षतेचे, नम्रतेचे प्रदर्शन केले आहे. ज्याचा आम्हाला आनंद आहे.’

‘न्यूझीलंडर्स ऑफ द ईयर’ पुरस्कारासाठी या दोन खेळाडूंव्यतिरिक्त वृत्त निवेदक सीमोन बारनेट, माजी देशांतर्गत क्रिकेटपटू मावू वातुवेई आणि ख्राईस्टचर्च मस्जिद हल्ल्याचा हिरो अब्दुल अजीज यांनाही नामांकन मिळाले आहे. 

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

वाढदिवस विशेष: दुसरा हर्षा होणे नाही..

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा सहावा भारतीय

काय सांगता! या संघाचा प्रशिक्षक कर्णधारापेक्षाही आहे तब्बल ७ वर्षाने लहान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment