---Advertisement---

ऐकलंत का! सामन्यापुर्वी लेडीज परफ्यूम लावतो बेन स्टोक्स, कारण ऐकून खदखदून हसाल

On: रविवार, मार्च 28, 2021 11:59 AM
Ben Stokes
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघात पुणे येथे झालेला दुसरा वनडे सामना अतिशय रोमांचक ठरला. या सामन्यात इंग्लंडचे फलंदाज जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी भारतीय गोलंदाजांची पुरती दैना करुन सोडली. त्यातही स्टोक्सने अवघ्या ५२ चेंडूत ९९ धावांची आतिशी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर चहूबाजूंनी स्टोक्सचे कौतुक होत असताना त्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे, ज्याला ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत.

इंग्लंड संघाचे क्रिकेटपटू कोणत्याही सामन्यापुर्वी महिलांचे डियोड्रेंट वापर असल्याचा आश्चर्यकारक खुलासा स्टोक्सने केला आहे. रेडिओ स्टेशन ‘टॉक स्पोर्ट्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.

स्टोक्स म्हणाला की, “इंग्लंडचे क्रिकेटपटू सामन्यापुर्वी महिलांचे डियोड्रेंट वापरतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या डियोचा गंध जास्त चांगला असतो. खास बाब म्हणजे, त्यांच्या डियोचा वास जास्त वेळ टिकून राहतो. याच कारणामुळे इंग्लंडचे अधिकतर क्रिकेटपटू पुरुषांच्या डियोपेक्षा जास्त महिलांचे डियो वापरतात.”

एवढेच नव्हे तर, त्या मुलाखतीत स्टोक्सला त्याच्या आवडत्या डियोसंदर्भात विचारण्यात आले. यावर उत्तर देताना स्टोक्स म्हणाला की, “मला डाळिंबाचा सुगंध असलेला डियो आवडतो.”

बेन स्टोक्सने दुसऱ्या वनडे सामन्यात बेयरस्टोसोबत दुसऱ्या विकेटसाठी १७५ धावांची भागिदारी केली होती. परिणामत इंग्लंडने भारताचे ३३६ धावांचे भलेमोठे आव्हान ४३.४ षटकातच पूर्ण केले होते. रविवारी (२८ मार्च) पुण्यात होणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यातही संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. दुसरीकडे स्टोक्सदेखील मागील सामन्यातील शतकाचा मलाल या सामन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.

महत्त्वाच्या बातम्या-

याला म्हणतात चढाओढ! रोहितने टी२०त केलेला ‘मोठा’ विक्रम, ‘या’ फलंदाजाने १५ दिवसातच काढला मोडीत

एका चुकीमुळे संकटात सापडला होता युवराज, परंतू आता होणार नाही कोणतीही कारवाई

टीम इंडियाच्या कुलदीप-चहल जोडीच्या प्रदर्शनात बिघाड, यामागचे कारण ‘कॅप्टनकूल’ तर नव्हे! पाहा कसं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---