नवी दिल्ली । इंग्लंड संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने आपले पुस्तक ‘बेन स्टोक्स ऑन फायरस’मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर निशाना साधला आहे. स्टोक्सने विराटला २०१९विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध पराभव मिळाल्यानंतर केलेल्या विधानावर घेरले आहे. त्याने विराटच्या वक्तव्याला वाईट म्हटले आहे.
विराटने केली वाईट तक्रार-
स्टोक्सने (Ben Stokes) आपल्या पुस्तकात लिहिले की, “विराटचे एजबॅस्टन मैदानाच्या (Edgbaston Stadium) बाऊंड्री (सीमारेषा) लाईनवर तक्रार करणे खूप विचित्र होते. मी सामन्यानंतर अशाप्रकारची वाईट तक्रार यापूर्वी कधीच ऐकली नाही. ही आतापर्यंतची सर्वात वाईट तक्रार होती.”
विराटने तक्रार करण्याचे कारण-
झाले असे की, २०१९च्या विश्वचषकात भारताने सर्व सामने जिंकले होते. परंतु ७व्या सामन्यात भारताचा सामना इंग्लंडबरोबर झाला होता. इंग्लंडसाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे होते. कारण श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत केले होते. इंग्लंडने सामना नाणेफेक (टॉस) जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३३७ धावांचा भली मोठी धावसंख्या उभारली होती. त्या सामन्यात बेयरेस्टोने या सामन्यात १११ धावा केल्या होत्या. तर स्टोक्सने ५४ चेंडूत ७९ धावांची खेळी केले होती.
इंग्लंडच्या भल्या मोठ्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. केएल राहुल (KL Rahul) लवकर बाद झाला होता. तसेच विराट (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) भारतीय संघाची खेळी सांभाळली. रोहितने त्या सामन्यात १५ चौकारांच्या मदतीने १०२ आणि विराटने ७ चौकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या होत्या.
इतके चांगले प्रदर्शन करूनही भारतीय संघाला या सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. पंंड्याने ४५ तर धोनीने ४२ धावांची खेळी केली होती. परंंतु जशी पाहिजे होती, तशी फलंदाजी झाली नाही. त्यामुळे भारतीय संघाला ५० षटकांमध्ये ५ बाद ३०६ धावाच करता आल्या.
सामना संपल्यानंतर विराट म्हणाला की, तो एजबॅस्टन मैदानाची बाऊंड्री आणि खेळपट्टी पाहून आश्चर्यचकीत झाला होता. त्याने कधीच विचार केला नव्हता की, इंग्लंडमध्येही अशाप्रकारची खेळपट्टी बनवली जाईल.
इंग्लंडने त्या विश्वचषकात ३ सामन्यात पराभव स्विकारूनही विश्वचषकावर आपले नाव कोरले. इंग्लंडने पहिल्यांदाच वनडे विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. अंतिम सामन्यात त्यांनी न्यूझीलंडला पराभूत करत विश्वचषक जिंकला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-टीम इंडियात अनुभवी नाही तर आवडत्या खेळाडूंना दिली जाते संधी, क्रिकेटपटूने साधला निशाना
-एकाच वनडेत ओपनिंग गोलंदाजी व ओपनिंग फलंदाजी करणारे ५ भारतीय
-भारतीय वंशाचे ‘हे’ पाच खेळाडू, ज्यांनी परदेशी संघांचे केले नेतृत्व