---Advertisement---

धू धू धुतलं! स्टोक्सने ५२ चेंडूत ठोकले १० खणखणीत षटकार, ‘या’ फलंदाजांची केली बरोबरी

On: शुक्रवार, मार्च 26, 2021 11:17 PM
---Advertisement---

इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज बेन स्टोक्स याला जोरदार फटकेबाजी करण्यासाठी ओखळले जाते. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पुणे येथे शुक्रवारी (२६ मार्च) झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याच्या वादळी खेळीचा नमुना पाहायला मिळाला. षटकार-चौकारांचा पाऊस पाडत त्याने अवघ्या ५० षटकात शतकाच्या जवळपास धावा चोपल्या. दरम्यान वनडेतील एक शानदार विक्रम त्याच्या नावावर झाला आहे.

सलामीवीर जेसन रॉय बाद झाल्यानंतर स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. सुरुवातीला बचावात्मक खेळी करत तो मैदानावर स्थिरावला. पुढे आक्रमक पवित्रा घेत षटकार-चौकारांच्या आतिषबाजीसह त्याने ५२ चेंडूत ९९ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने १० खणखणीत षटकार आणि ४ चौकार मारले. अखेर ३५.२ षटकात भुवनेश्वर कुमारने रिषभ पंतच्या हातून त्याला झेलबाद केले.

अशाप्रकारे भारताविरुद्ध एका वनडे डावात स्टोक्सने सर्वाधिक षटकार मारण्याचा किर्तीमान केला आहे. याबाबतीत त्याने कायरन पोलार्ड आणि एंजिलो मॅथ्यूज यांची बरोबरी केली आहे. तर एबी डिविलियर्स अजूनही स्टोक्सच्या पुढे आहे. त्याने भारताविरुद्ध एका वनडे सामन्यात तब्बल ११ षटकार मारण्याचा पराक्रम केला होता.

https://twitter.com/Cric_beat/status/1375467529699688451?s=20

इंग्लंडने मारली बाजी 
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. भारतीय संघानेही याचा फायदा घेत ५० षटकात ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा करत इंग्लंडला ३३७ धावांचे आव्हान दिले. भारताकडून केएल राहुलने १०८ धावांची शतकी खेळी केली. तर रिषभ पंतने ७ षटकारांसह आक्रमक ७७ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीने ६६ धावांची अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून रिस टोप्ली आणि टॉम करनने सर्वाधिक प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

प्रतिउत्तरादाखल ३३७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोने ११० धावांची भागीदारी करत इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली. जेसन रॉय ५५ धावांवर बाद झाला.

त्याच्यानंतर बेअरस्टोला बेन स्टोक्सने शानदार साथ दिली. स्टोक्स आणि बेअरस्टोमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १७५ धावांची भागीदारी झाली. या भागीदारीने इंग्लंडचा विजयाचा मार्ग सोपा केला. स्टोक्स ९९ धावांवर बाद झाल्याने ही भागीदारी तुटली. त्याच्यापाठोपाठ बेअरस्टो १२४ धावा करुन बाद झाला. पण तो पर्यंत इंग्लंडसाठी विजय दृष्टीक्षेपात आला होता.

अखेर डेव्हिड मलानने नाबाद १६ आणि लियाम लिव्हिंगस्टोनने नाबाद २७ धावाकरत इंग्लंडला विजयापर्यंत पोहचवले. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

वातावरण तापलं! सॅम करनची बडबड ऐकून मागे धावला हार्दिक, पंचांना थांबवावे लागले वाद, पाहा व्हिडिओ

दुर्दैवी बेन स्टोक्स, अवघ्या एका धावेने हुकले वनडे शतक; नकोशा यादीत झाला समावेश

शतक सोडा स्टोक्स अर्धशतकाच्याही नजीक गेला नसता, पंचांचा ‘तो’ निर्णय बरोबर का चूक? तुम्हीच ठरवा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---