इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने मागील वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. व्यस्त वेळापत्रक तसेच कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे म्हटलेले. त्यानंतर आता यावर्षी होत असलेल्या वनडे विश्वचषकासाठी तो पुन्हा एकदा आपली निवृत्ती माघारी घेत इंग्लंडसाठी खेळू शकतो असे अनेक जण म्हणतात दिसत आहेत. स्वतः स्टोक्स याला याबाबत विचारले असता त्याने आपल्या पुनरागमनाविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले.
इंग्लंडला पहिला वनडे विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू असलेल्या स्टोक्सने मागील वर्षी वनडे क्रिकेटमधून थांबण्याचा निर्णय घेतला. व्यस्त वेळापत्रकामुळे तसेच युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे म्हटले होते. स्टोक्स हा आक्रमक फलंदाजी तसेच मध्यमगती गोलंदाजी करत संघासाठी योगदान देऊ शकतो. त्याला भारतात खेळण्याचा मोठा अनुभव असल्याने विश्वचषकासाठी तो पुनरागमन करू शकतो असे अनेक माजी खेळाडू म्हटलेले.
ऍशेस मालिकेतील अखेरच्या कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेत याबाबत त्याला विचारले असता तो म्हणाला,
“वनडे संघात पुन्हा येण्याचा प्रश्नच नाही. मी निवृत्ती घेतली होती आणि मी त्यावर ठाम आहे. ऍशेस मालिका संपल्यानंतर मी मोठ्या सुट्टीवर जाणार आहे.”
स्टोक्सने 2019 वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शानदार अष्टपैलू कामगिरी करत इंग्लंडला प्रथमच विश्वचषक जिंकून दिला होता. त्यानंतर मागील वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत देखील त्याने नाबाद खेळी केली होती.
दरम्यान स्टोक्सच्या वनडे कारकिर्दीचा विचार केला, तर एकूण 104 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून एकूण 2919 धावा निघाल्या. तसेच गोलंदाजीत त्याने 74 विकेट्स घेतल्या.
(Ben Stokes Speaks On His ODI Retirement Return)
महत्त्वाच्या बातम्या-
विरोधी संघांनो सावधान! वनडे विश्वचषकात खेळण्यासाठी इंग्लंडचा जबरदस्त खेळाडू फिट, लगेच वाचा
वेस्ट इंडिज मालिका एवढी महत्त्वाची आहे तरी का? कॅप्टन रोहितने सांगितलं मोठं कारण